घरमहाराष्ट्रखाड्याचापाडा येथील तिन्ही जमीन मोजण्या सदोष

खाड्याचापाडा येथील तिन्ही जमीन मोजण्या सदोष

Subscribe

 दोषी अधिकार्‍याकडे डोळेझाक

कर्जत तालुक्यातील खाड्याचापाडा येथील बोगस जमीन मोजणीप्रकरणी एकच नव्हे तर तीनदा सदोष मोजणी झाल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे. जमीन मोजणी अधिकारी उत्तम केंद्रे दोषी असल्याचे उघड झाले आहे. मात्र सदर वादग्रस्त प्रकरणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर होऊनही अद्याप कारवाईबाबत दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे.

सर्व्हे क्रमांक 19/3 या मिळकतीबाबत कर्जत येथील दिवाणी कार्यालयात दावा प्रलंबित असताना व सदर जागेची आकारफोड झालेली नसताना 2011-12 ते 2013-14 या कालावधीत तीनदा जमीन मोजणी झाली. या तिन्ही मोजणीच्या कामात जाणीवपूर्वक सदोष कार्यवाही केल्याप्रकरणी भूकर मापक केंद्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी शेतकरी गोविंद मालू डायरे यांनी उपसंचालक (भूमी अभिलेख, मुंबई) व जिल्हा भूमी अधीक्षक (अलिबाग) यांच्याकडे मागितली होती. या अनुषंगाने जिल्हा भूमी अधीक्षकांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

सदर प्रकरणी कर्जतच्या भूमी अभिलेख उपअधीक्षकांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1666 मधील कलम 258 अन्वये पुनर्विलोकन करण्याची परवानगी मागितली होती. या प्रकरणी दोषारोप असलेल्या केंद्रे यांनी आपला लेखी जबाबदेखील सादर केला आहे. हा अहवाल जिल्हा अधीक्षक व उप संचालकांना सादर करण्यात आला आहे. तिन्ही मोजणीप्रकरणी सदोष कार्यवाही झाल्याचे या चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधित मोजणी अधिकारी केंद्रे (सध्या नगर भूमापन अधिकारी, मुलुंड-कुर्ला) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा 1979 मधील नियम 8 नुसार कारवाई करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे.

सदर प्रकरणी भूमी अभिलेख अधीक्षकांनी अधिक विलंब न करता उचित कार्यवाहीचे आदेश द्यावेत. या निर्णयावर आमच्यासारख्या गरीब शेतकर्‍यांचे अस्तित्त्व अवलंबून आहे. सदर मोजणी रद्द कराव्या व दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण करू.
-गोविंद मालू डायरे, तक्रारदार शेतकरी

- Advertisement -

सदर चौकशी अहवालाबाबत जिल्हा अधीक्षक यांच्याकडून काही त्रुटी दाखवल्या होत्या. सदर अहवाल पूर्ततेसह पुन्हा पाठवण्यात आला आहे. तो उपसंचालक यांना पाठविण्यात येईल. त्यावर चौकशी होईल.
-इंद्रसेन लांडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -