घरमुंबईचोर समजून प्रियकराला चोपले

चोर समजून प्रियकराला चोपले

Subscribe

विरारमध्ये चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची घटना फुलपाडा येथील डोंगरी परिसरात घडली आहे. मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास याच परिसरात राहणारा एक तरुण मद्यधुंद अवस्थेत आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रिलवर चढून मोठ्या कसरतीने टेरेसपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी चोर समजून लोकांनी त्याला चोप दिला.

रात्री एका बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या पाईपने वर चढणार्‍या तरुणाकंडे काही लोकांचे लक्ष गेले. मागील बर्‍याच दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने हा चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर ओरडायला सुरुवात केली. परिणामी आपल्याला चोर समजत असल्याचे या तरुणाला समजताच हा तरुण दचकला व पळ काढू लागला. तो एका बिल्डिंगच्या टेरेसवरून दुसर्‍या बिल्डिंगवर उड्या घेत असल्याने नागरिकांना हा नक्कीच अट्टल चोर असल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला.

- Advertisement -

अखेर दोनशे ते तीनशेहून अधिक संतप्त नागरिकांनी या कथित चोराला खाली उतरवून बेदम चोप देत आपल्या संतापाची वाट मोकळी करून दिली. नागरीकांनी विचारपूस केली तेव्हा तो नसून आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकर असल्याचे उजेडात आले आणि रागाबरोबरच हसूही फुटले. नागरिकांच्या मारहाणीत हा तरुण बर्‍यापैकी जखमी असून, प्रेयसीला भेटण्यासाठी केलेली ही कसरत त्याला चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी अद्यापही विरार पोलिसांत या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -