घरदेश-विदेशLive Update : मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल

Live Update : मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल

Subscribe

मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल

मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मेहबूब शेख आणि फिर्यादीविरुद्ध दाखल केली एफआयआर

- Advertisement -

मेहबूब शेख शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष आहेत


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारी रोजी कार्यकर्ता शिबिर

- Advertisement -

सीबीआय पथकाची नाशिकमध्ये मोठी कारवाई, रिजनल पीएफ कमिशनरला केली अटक

2 लाखांच्या लाचखोरी प्रकरणात सीबीआयची कारवाई


IND VS SA : दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 32 धावांनी विजय


पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर


जेजेतील डॉक्टरांचा संप मागे

त्वचा व गुप्तरोग शास्त्र विभागातील प्राध्यापकांची बदलीचे आदेश निघाल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे


राज्यभरात राम प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार

18 ते 22 जानेवारी दरम्यान राज्यभरात उत्सव साजरा होणार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला


काँग्रेसच्या रॅलीत मल्लिकार्जुन खर्गेंचं मराठीतून भाषण

आरएसएस देशाला बरबाद करत आहे – मल्लिकार्जुन खर्गे


भाजपमध्ये आता सहन होत नाही, असं भाजपा खासदाराने सांगितलं – राहुल गांधी

भाजपाचे अनेक खासदार आधी काँग्रेसमध्ये होते. भाजपामध्ये राहणं आता सहन होत नाही, असं भाजप खासदाराने सांगितलं. भाजपमाध्ये गुलामी सुरू असल्याचं खासदाराने सांगितलं. नाना पटोले यांनी मोदींना एक प्रश्न विचारला, पण प्रश्न आवडला नाही, म्हणून त्यांना बाहेर पाठवण्यात आलं. मात्र काँग्रेसमध्ये छोटा कार्यकर्ताही बोलू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले.


नागपूरमधून महात्मा गांधींनी हुकूमशाहीला आव्हान दिले – नाना पटोले

भारताला महासत्ता बनवण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं


छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2024

‘वेध’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ परिसरात आर्ट फेस्टिवल 2024 दि. 11 जानेवारी ते दि. 14 जानेवारी 2024 दरम्यान संपन्न होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 यावेळेत हे आर्ट फेस्टिवल बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, वनिता समाज सभागृह आणि परिसर, पार्क क्लब जवळील मैदान, माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतिस्थळाच्या मागील जागेत होणार आहे.


सोलापुरात तरुणाचा आत्मदहणाचा प्रयत्न

जिल्हा नियोजनाच्या बैठकीबाहेर तरुणाचा गोंधळ

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळ दिल्याचा तरुणााचा आरोप

पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात


ठाणे सिनेगॉगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल

ठाणे पोलिसांना आला मेल, पोलिसांकडून वाहतुकीसाठी सर्व रस्ते बंद

ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा मेल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू

राज ठाकरे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट


मध्य रेल्वे 30 ते 35 मिनीट उशिराने


पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने


राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, दुपारी 12.30 वाजता वर्षा निवास्थानी टोल संदर्भात करणार चर्चा


DMDk चे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन

लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत (Vijaykanth) यांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आलं आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


सुनिल केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी


काँग्रेसचा 139 वा स्थापना दिन; मल्लिकार्जून खर्गेंसह या नेत्यांची उपस्थिती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, खासदार राजीव शुक्ला, पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर नेते दिल्लीतील AICC मुख्यालयात पक्षाच्या 139 व्या स्थापना दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत.


शरद पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी दाखल


भीषण अपघात; डंपरला धडकल्यानंतर बसने घेतला पेट, 13 प्रवासी जिवंत जळाले

भोपाळमधील गुना येथे भीषण अपघात झाला आहे. बुधवारी, रात्री 9 च्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 13 प्रवासी जिवंत जळाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -