घरदेश-विदेशLive Update : राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना

Live Update : राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना

Subscribe

राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने

- Advertisement -

नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना झाले

या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

- Advertisement -

आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे


मराठवाड्याचे विभागीय आयुक्त विशेष विमानाने मुंबईत

छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत

मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते वाशीला जाणार असल्याची माहिती आहे


कामाठीपुरा येथे भीषण आगीत जळून एकाचा मृत्यू

धनश्याम प्रजापती (20) असे मृत व्यक्तीचं नाव आहे

कामाठीपुरा भागात लागलेल्या आगीत गोदाम जळून खाक झाले


मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

देवेन भारती,सत्यनारायण चौधरीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आढावा घेत आहेत


आझाद मैदानाकडे निघालो तर मागे फिरणार नाही

आझाद मैदानात जाणारच. अध्यादेश मिळाला तर गुलाल उधळू, नाही मिळाला तर आमरण उपोषण करू

मनोज जरांगेंनी अध्यादेशासाठी शासनाला उद्या सकाळी 11 पर्यंतची वेळ

रात्रीतून अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानाला जाणार

सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या – मनोज जरांगे

सरकारी भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवा – जरांगे

आरक्षण मिळेपर्यंत 100 टक्के शिक्षण मोफत करा – मनोज जरांगे

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे ही महत्त्वाची मागणी.

याबाबतचे आदेश दिल्याचे पत्र हवी असल्याची मागणी. त्यामुळे त्या पत्राची तयारी करावी.

शपथ पत्राच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे, पण त्याची शासनाकडून चौकशी करण्यात यावी.

जर का शपथपत्र 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर न घेता ते मोफत करा. कारण प्रत्येक शपथ पत्रासाठी 100 रुपये दिले तर कसे व्हायचे.

शिंदे समिती रद्द करायची नाही, तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात काम करायचे

वर्षभरासाठी टप्प्याटप्प्याने शिंदे समितीची वेळ वाढविता येणार

ज्या लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, त्यांचा डेटा मागविण्यात आला आहे – जरांगे पाटील

मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत – मनोज जरांगे

37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याची शासनाची माहिती

वाशीतील मनोज जरांगे यांच्या सभेला सुरुवात


‘स्किल सेंटर ऑन व्हील’ या फिरत्या बसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने बसद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार


संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्राच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक

मुख्यमंत्र्यांनी डेनिस फ्रान्सिस यांना गणपतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत


मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, दीपक केसरकरांची माहिती

11 वाजल्यापासून मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात

मनोज जरांगे 2 वाजता सरकारचा जीआर वाचून दाखवणार

मराठा आंदोलकांपर्यंत आवाज पोहोचत नसल्याने मनोज जरांगे एक तासाने चर्चा करणार

मनोज जरांगे 2 वाजता मराठा समाजाशी चर्चा करणार

मनोज जरांगे पाटील यांची वाशीच्या शिवाजी चौकात सभा

सरकारसोबत मनोज जरांगेंची सकारात्मक चर्चा


महाराष्ट्राच्या चित्ररथातून छत्रपती शिवरायांचे 350 व्या राज्याभिषेकाचे दर्शन

कर्तव्य पथावर भारतातील राज्यांच्या चित्ररथांच्या संचलनाला सुरुवात

फ्रान्सच्या सैन्यदलाचे कर्तव्य पथावर संचलन

61 व्या घोडदलाकडून सलामी मंचाला मानवंदना

नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर परेडला सुरुवात

पहिल्यांदाच कर्तव्य पथावर महाराष्ट्रातून 100 महिला असलेले ढोल ताशा पथक सहभागी

कर्तव्य पथावर राष्ट्रपती मुर्मूंनी केले ध्वजावंदन

कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्य पथावर दाखल

राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पंतप्रधान मोदींचे हुतात्म्यांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे उपस्थित


मराठ्यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला

मनोज जरांगे आझाद मैदानात जाण्यावर ठाम


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वज वंदन

मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा


मुंबईच्या ग्रँटरोडमधील लाकडाच्या गोदामात आगीचे तांडव

घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत

घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या दाखल

मध्यरात्रीच्या सुमारास नेमकी आग कशामुळे लागली? याचे कारण अस्पष्ट


मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर दाखल

मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्चा

मराठा समाजाच्या वादळाचा आज मोर्चाचा अखेरचा दिवस


देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे.

दिल्लीच्या राजपथावर काहीच वेळात पथ संचलनाला होणार सुरुवात


मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा पाठिंबा

आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी इंदुरीकर महाराजांचे पुढील तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द

याआधी इंदुरीकर महाराजांनी जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी पाच दिवसांचे कार्यक्रम रद्द केले होते

इंदुरीकर महाराजांच्या या पाठिंब्याची माहिती त्यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांच्याकडून देण्यात आली आहे.


चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या

शिवा वझरकर असे ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाचे नाव

अज्ञात आरोपींनी शिवा वझरकर याची हत्या करून त्याचा मृतदेह त्याच्या मित्राच्या कार्यालयाजवळ टाकल्याने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -