घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसें चराचरैक भाग्य । जें ब्रह्मेशां आराधना योग्य । योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥
याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व जी योग्याची उपभोग घेण्याची वस्तु,
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥
जो आद्यज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्वातील प्राणिमात्रांचे जीवन .
जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा । तो श्रीकृष्णजी पांडवा । प्रती बोलिला ॥
जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा व यादवकुळाचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला बोलला.
ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढारी मातु । ज्ञानदेव म्हणे ॥
असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका.
तरी अवधान एकलें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥
श्रीज्ञानेश्वर म्हणतात,‘श्रोतेहो, ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक हे स्पष्ट सांगतो की, तुम्ही तुमचे लक्ष इकडे दिले, तर सर्व सुखाला पात्र व्हाल.’
परि प्रौढी न बोलों हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥
पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलत नाही हो! ‘तुम्ही लक्ष द्या’, ही माझी तुम्हाला लडिवाळपणाची विनंती आहे.
कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होतीं । तुम्हांऐसीं ॥
कारण तुम्हासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर, आवड म्हणून जी एक वृत्ती आहे, तिचीदेखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची इच्छा तृप्त होते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -