घरमहाराष्ट्रलोहगाव विमानतळाचा होणार विस्तार

लोहगाव विमानतळाचा होणार विस्तार

Subscribe

पुण्यातील लोहगाव विमानतळाचा विस्तार होणार आहे. येत्या दोन वर्षांत पुणे विमानतळावरून दरवर्षी किमान १ कोटी प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल. तसेच आगामी पाच वर्षात वाढणारी प्रवासी संख्या आणि वाढणाऱ्या विमानांच्या फेऱ्या लक्षात घेता विमानतळ विस्तारीकरण केले जाणार आहे.

जगाला जोडणाऱ्या पुण्यातील लोहगाव विमानतळाचे चित्र आता बदलणार असून जगाच्या नकाशावर आलेले लोहगाव विमानतळ आता नजीकच्या दोन वर्षांत कात टाकणार आहे. विमानतळाच्या सध्याच्या इमारतीच्या आवारात आता ४२ हजार स्वेअर मीटर भागात नवी इमारत साकारणार असून त्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, यापैकी ३५८ कोटी रुपयांच्या कामांना २० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पाठपुराव्याला अखेर यश मिळाले

पुणे विमातळावरून २०१३- १४ मध्ये दरवर्षी ३५ लाख ९६ हजार ६८४ प्रवाशांची ये – जा होत असे. २०१७- १८ मध्ये ही संख्या ८१ लाख ६४ हजार ८४० वर पोचली आहे. विमानांच्या फेऱ्याही ३० हजार ५३४ वरून ५७ हजारांवर पोचल्या आहेत. येत्या दोन वर्षांत पुणे विमानतळावरून दरवर्षी किमान १ कोटी प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल. तसेच आगामी पाच वर्षात वाढणारी प्रवासी संख्या आणि वाढणाऱ्या विमानांच्या फेऱ्या लक्षात घेता विमानतळ विस्तारीकरण हा शहरासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. लोहगाव विमानतळाकडे याआधी २६ एकर जागा होती. त्यानंतर विमानतळाच्या सोईसाठी ही जागा वाढवून मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो त्याला अखेर यश आले असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडून साथ मिळाली

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली १६ एकर जागा एप्रिल २०१८ मध्ये विमानतळ प्रशासनाला देण्यात आली आहे. याखेरीज कार्गो पार्किंग, कार्यालयीन व्यवस्था आणि निवासी संकुलासाठी आणखी ३५ एकर जागा मिळावी यासाठी मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांना यश येऊन विमानतळाला आणखी ३५ एकर जागा मिळेल अशी आशा असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. तसंच केंद्रीय मंत्री अरुण जेटली, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर यांच्याकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांनीही त्याला मोलाचे सहकार्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांचीही साथ या प्रकल्पासाठी मिळाली असल्याचे देखील शिरोळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -