घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024: फडणवीस आणि अजित पवार गावागावात धमक्या देतायत; संजय राऊतांचा...

Lok Sabha 2024: फडणवीस आणि अजित पवार गावागावात धमक्या देतायत; संजय राऊतांचा आरोप

Subscribe

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात बारामतीची सीट तर प्रतिष्ठेची बनली आहे. पवार कुटुंबीयांमध्येच ही लढत असल्याने ही लढाई चुरशीची झाली आहे. महायुतीचा उमेदवार येथे महाधिक्याने निवडून यावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमधील प्रत्येक गावागावात धमक्या देत असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात बारामतीची सीट तर प्रतिष्ठेची बनली आहे. पवार कुटुंबीयांमध्येच ही लढत असल्याने ही लढाई चुरशीची झाली आहे. महायुतीचा उमेदवार येथे महाधिक्याने निवडून यावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमधील प्रत्येक गावागावात धमक्या देत असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यांना विजयी होण्याचा इतका आत्मविश्वास आहे मग धमक्या देत का फिरतायतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Lok Sabha Election 2024 Baramati LokSabha Devendra Fadnavis and Ajit Pawar threaten Voters Sanjay Raut s allegation)

राज्यातील काही मतदारसंघात भाजपाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला आहे. मुंबईत असे दोन ते तीन मतदारसंघ आहेत. तिथे महायुती उमेदवारी जाहीर करू शकली नाही. दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. इतर काही ठिकाणी महायुतीने औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. त्यात उज्ज्वल निकम यांना भाजपाने उभं केलं होतं. ठाण्यात, मुख्यमंत्र्यांच्या गडात, बालेकिल्ल्यात अजून उमेदवारी देण्यात आली नाही. नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे. आम्ही राज्यात 35 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

धमक्या दिल्या जातायंत

राज्यातील अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या देत आहेत. सोलापुरात उत्तम जानकर यांच्या नावाने धमकी देण्यात येत आहे. बारामती आणि शिरूर मतदारसंघामध्ये स्वत: अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी आणि उद्योजक ही सगळं काम करणारी मंडळी. त्यांना बोलावून दंड करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे धमक्या देण्याची भाषा जर तुम्ही करत असाल तर राज्यातील जनतेने ठरवलेले आहे की काय करायचे ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक घाबरतील. तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, असे ठेकेदार घाबरतील. पण जनता हा दबाव झुगारेल असं राऊतांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंची आम्ही सर्व भावंडं

अजित पवार सारखं म्हणतात की, सुप्रिया सुळेंसाठी सर्व भावंडं पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरत आहेत. माझ्यासाठी कधी कोणी फिरलं नाही. पण, केवळ तीच कशाला आता या क्षणी आम्ही सर्व सुप्रिया सुळेंची भावंडं आहोत. बारामतीची लढाई प्रतिष्ठेची आहे आणि ही लढाई सुप्रिया सुळेचं जिंकणार, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024: मोदींना सिरियसली घेऊ नका; 4 जूनला आम्ही…; राऊतांचं खुलं आव्हान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -