घरताज्या घडामोडीLok Sabha : लोकसभा केवळ ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल; जानकरांचा महायुतीला...

Lok Sabha : लोकसभा केवळ ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल; जानकरांचा महायुतीला इशारा

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. या याद्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रासप पक्षाने यंदा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू, या मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. या याद्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रासप पक्षाने यंदा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू, या मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर नाराज झाले असून त्यांनी भाजपसह महायुतीला इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक हा फक्त ट्रेलर असेल, खरा पिक्चर तर विधानसभेत दिसणार असल्याचा इशारा रासप नेते महादेव जानकरांनी भाजप आणि महायुतीला दिला आहे. (Lok sabha 2024 madha constitution mahadev jankar sharad pawar bjp ncp)

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाची 9 उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीनुसार माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. अशातच आता महादेव जानकर यांनी महायुतीला इशारा दिला आहे. “सर्व 48 लोकसभा मतदारसंघात रासपचा दणका बसणार आहे. जो काही धनगर आणि ओबीसी समाज आमच्यामुळे भाजपसोबत होता, तो आता भाजपकडे पाठ फिरवताना दिसेल. लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दिसेल”, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.

- Advertisement -

“काही काळापूर्वी भाजपने आम्हाला मंत्रिपदाचा एक बैल दिला होता. हा बैल आम्ही भाजपकडे धनगर आणि ओबीसी समाजाची मते वळवून परत केला. मात्र, भाजपने आमचा आमदार फोडला. आम्हाला लोकसभेला जागा नाकारण्यात आली. त्यामुळे आता शरद पवारांनी आम्हाला एक बैल दिला असून, आता त्यांचा आणि आमचा बैल जोडून महाराष्ट्राची शेती फुलवणार आहे. भाजप किंवा काँग्रेसने भारत स्वतंत्र झाल्यापासून आजवर कधीही धनगर समाजाला लोकसभेत पाठवले नव्हते. मात्र, शरद पवारांनी पहिल्यांदा धनगर समाजाला ही संधी दिल्याने राज्यातला धनगर समाज शरद पवार यांना धन्यवाद देत आहे. आमच्यासाठी जे भाजपने केले होते, त्याची आम्ही परतफेड केली असून आता आघाडीसोबत आम्ही असल्याने आमचा फायदा आघाडीला मिळेल”, अशा शब्दांत भाजपला इशारा देत महादेव जानकर यांनी महायुतीतून काढता पाय घेतला.

राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाचे मतदान आहे. परभणी, सांगली आणि माढा लोकसभा जागेवर मागणी करूनही भाजपने आम्हाला एकही जागा न दिल्याने आम्ही आता महाविकास आघाडीत सामील झाल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, माढा लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये निवडणूक लढविली, तेव्हा आपण नवखे असूनही लाखभर मते मिळविली होती. आता आमचा पक्ष संघटना आणि समाज यांनी मनावर घेतले आहे. आता माढ्यातून 2 लाखांच्या फरकाने रणजित निंबाळकर यांचा पराभव करणार असा दावाही जानकर यांनी केला. शिवाय, माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवार मोहिते पाटील किंवा रामराजे निंबाळकर यांच्याकडे देतील असे राज्याला वाटत असताना शरद पवार यांनी रासप वर विश्वास दाखवला. आता याचा फायदा आघाडीला राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात दिसेल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवार माढ्यातून जानकरांना उमेदवारी देणार? 9 जणांची संभाव्य यादी समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -