घरताज्या घडामोडीLive Update : काँग्रेसची राज्यचातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Live Update : काँग्रेसची राज्यचातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Subscribe

काँग्रेसची राज्यचातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, गडचिरोली नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोले यांना उमेदवारी

- Advertisement -

23/3/2024 22:44:51


वरळीतील होळी महोत्सवात आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकत्र

- Advertisement -

23/3/2024 21:29:8


KKR VS SRH : कोलकाता संघाचे हैदराबादसमोर 209 धावांचे आव्हान

आंद्रे रसेलचे 20 चेंडूंत अर्धशतक

आंद्रे रसेलने 25 चेंडूंत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या

23/3/2024 21:20:19


DC VS PBKS : पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेट्सने केला पराभव

23/3/2024 19:27:6


छत्रपती शाहू महाराजांना वंचित आघाडीचा पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

काँग्रेसचे 7 जागांवर एकमत झाले तर चांगले – प्रकाश आंबेडकर

सात जागा कोणत्या त्या काँग्रेसने आम्हाला सांगावे – प्रकाश आंबेडकर

26 मार्चपर्यंत आम्ही थांबू त्यांनतर आमची भूमिका मांडू – प्रकाश आंबेडकर

23/3/2024 16:8:4


राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज अमित शहा यांना भेटणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदयनराजे भोसले भेटणार असल्याची माहिती.

गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे भोसले राजधानी दिल्लीत.

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उदयनराजे भोसले इच्छुक

23/3/2024 15:47:39


प्रकाश अण्णा शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांची घेतली भेट

23/3/2024 15:46:57


अमित शाहांच्या भेटीसाठी उदयनराजे भोसले तीन दिवसांपासून दिल्लीत

23/3/2024 15:10:50


शिवाजीराव अढळराव पाटलांचा 26 तारखेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार

23/3/2024 11:59:12


गँगस्टर प्रसाद पुजारीला हँककॉकमधून अटक

23/3/2024 10:58:41


रशियातील दहशतवादी हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी, आयसिसने स्वीकारली जबाबदारी

23/3/2024 8:51:53


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लसाठी रवाना

23/3/2024 8:51:53


शिवाजीराव आढळराव पाटील हे आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता

अजित पवारांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत प्रवेश करणार आहेत.

बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

आढळराव पाटील यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

आज सकाळी 10 वाजता मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे.

23/3/2024 8:9:45


पुणे विद्यापीठात ठाकरे गटाच्या युवासेनेची विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे.

व्हॉट्सऍप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ वादावरून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे.

या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राम थरकुडे, वैभव दिघे, करण वाकवडे आणि इतर ६ जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

23/3/2024 8:9:45


पुणे शहरात जड, अवजड वाहतूक बंदी

पुणे शहरातून येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहतूक यापुढे बंदी असणार आहे.

शहरातून सोलापूर, नगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी या रस्त्यांवरून जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ट्रक आणि इतर वाहनांनी येताना आणि जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्चपासून पूर्ण वेळ बंदी असेल.

या वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.

23/3/2024 8:9:45


सोलापुरातील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल

आपचे शहराध्यक्ष निहाल किरनल्ली, युवा आघाडी अध्यक्ष निलेश संगेपागसह इतर 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना ईडीने अटक केल्यामुळे सोलापुरातील पूनम गेटवर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने आचारसंहिता लागू असताना जमावबंदीचा भंग केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर बझार पोलीस ठाण्यात कलम 37 आणि 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

23/3/2024 8:9:45


पश्चिम लिंक रोडवर सिमपोली मेट्रो स्टेशनच्या खालील पाण्याची पाइपलाइन फुटली

मुंबई बोरिवली पश्चिम लिंक रोडवर सिमपोली मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या सिग्नलजवळ महापालिकेच्या पाण्याची पाइपलाइन फुटली आहे.

रस्त्यावर सतत पाणी वाहत असून सिमपोली मेट्रो स्टेशनच्या खालील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -