घरमहाराष्ट्रLok Sabha polls 2019: तर २ रूपयांमध्ये दुसर्‍यांदा मतदान शक्य!

Lok Sabha polls 2019: तर २ रूपयांमध्ये दुसर्‍यांदा मतदान शक्य!

Subscribe

मुंबईसहीत १७ लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवार, २९ एप्रिल) चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील हा अखेरचा टप्पा असल्यामुळे सर्व देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. चौथ्या टप्प्यात जादातर शहरी भागातील मतदारसंघाचा समावेश आहे. “मतदान करताना आपण निवडलेल्या उमेदवाराच्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर न दिसल्यास मतदाराला पुन्हा मतदान करण्यासाची संधी मिळणार आहे. पुन्हा मतदान करण्यासाठी मात्र दोन रूपये भरूनच मतदान करता येईल. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदाराला तक्रार करण्याची अशी सुविधा आहे. तक्रार केल्यावर दुसर्‍यांदा मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून परवानगी देण्यात येईल. तसेच या अधिकार्‍यांच्या देखरेखीत हे मतदान होईल.”

पण व्हीव्हीपॅट मशीनमध्ये आपण मतदान करत असलेल्या पक्षा एवजी दुसर्‍या पक्षाचे चिन्ह दिसते आहे, ही मतदाराची तक्रार खोटी निघाल्यास शिक्षेला सामारे जावे लागेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्या मतदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच खोटी माहिती देण्यासाठी कायद्यान्वये ती व्यक्ती सहा महिने शिक्षेसाठी पात्र ठरेल. देशात याआधी झालेल्या निवडणूकीच्या विविध टप्प्यात एकदाच असा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पण ही माहिती खोटी निघाल्याने त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या टप्प्यासाठी पोलीसही सज्ज; मुंबईत चोख बंदोबस्त!

- Advertisement -

 

- Advertisement -

मतदानाच्या जोडून सुटीच्या निमित्ताने मोठा विकेंड आला असला तरीही आधी मतदान आणि मग हॉलिडे आनंद घ्या, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले. तर मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची काळजी म्हणून मतदान केंद्रावर मोबाईल फोनचा वापर करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणुक अधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

७० टक्के लोकापर्यंत ओळख चिठ्ठी पोहचली

मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठीची ओळखचिठ्ठी आतापर्यंत विविध राजकीय पक्षांकडून वितरीत केली जायची. पण यंदाच्या वर्षापासून निवडणूक आयोगानेच ही चिठ्ठी मतदारापर्यंत घरोघरी जाऊन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरातील दोन लोकसभा मतदारसंघात ही ओळखचिठ्ठी मतदारापर्यंत पोहचवताना अनेक आव्हाने आली अशी माहिती जोंधळे यांनी दिली. झोपडपट्ट्यांमध्ये मतदारांचा पत्ता योग्य नसल्याने अनेकांपर्यंत ही ओळखचिठ्ठी पोहचवण शक्य झाले नाही. अनेक ठिकाणी घराला टाळे आढळले. तर अनेक झोपडी भागात पुनर्वसनाच्या प्रकल्पामुळे त्या मतदारापर्यंत निवडणूक विभागाचे कर्मचारी पोहचू शकले नाही.

मतदारापर्यंत विविध कारणांमुळे पोहचता आले नाही याचे प्रमाण ३० टक्के आहे. तर ७० टक्के मतदारांपर्यंत पोहचण्यात आम्हाला यश आल्याचे जोंधळे यांनी स्पष्ट केले. उच्चभ्रू लोक वस्तीतही अनेक ठिकाणी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना रोखण्यात आले. पण मतदानासाठी ओळखचिठ्ठी देण्यासाठी पोहचणार आहोत, असे सांगितल्यावर अनेक ठिकाणी परवानगी मिळणे शक्य झाले.

१० मिनिटांमध्ये फॉल्टी मशीन चेंज होणार

निवडणुक आयोगाकडून मतदान सुरू होण्याआधी म्हणजे सकाळी ७ वाजण्याआधी मॉक टेस्ट करण्यात येते. ज्यामध्ये ५० मत ही चाचणी तत्वावर पोलिंग एजंटच्या तपासणीत चाचपणी केली जातात. या टेस्टिंगनंतरच मतदानासाठी मशीन वापरण्यात येते. मशीनमध्ये बिघाड आढळल्यास अवघ्या १० मिनिटांमध्ये मशीन बदवलण्यात येणार असल्याचे जोंधळे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक मतदान केंद्रावर स्पेअर मशीन देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांवरही जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -