घरमुंबईचौथ्या टप्प्यासाठी पोलीसही सज्ज; मुंबईत चोख बंदोबस्त!

चौथ्या टप्प्यासाठी पोलीसही सज्ज; मुंबईत चोख बंदोबस्त!

Subscribe

सोमवारी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांचे ४० हजार ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह सीपीएमएफ, एसआरपीएफ आणि होम गार्ड्सला विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मुंबई शहरात कुठेही असुरक्षित बूथ नसून ३२५ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत लोकसभेचे ६ मतदारसंघ असून त्याअंतर्गत विधानसभेचे ३६ मतदारसंघ येतात. या ६ पैकी ४ मुंबई उपनगर तर २ मुंबई शहरात येतात.

मतदान केंद्रांवर बंदोबस्त

मुंबईत १ हजार ४९२ ठिकाणी १० हजार ०७३ बूथ असून त्यातील मुंबई शहरात २६०२ ठिकाणी ५२७ बूथ तर मुंबई उपनगरात ९६५ ठिकाणी ७ हजार ४७२ बूथ आहेत. कोणतेही असुरक्षित बूथ नसले तरी ३२५ मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र ४० हजार ४०० पोलिसांसह १४ कंपन्या सीपीएमएफ, १२ कंपन्या एसआरपीएफ, ६ हजार होम गार्ड निवडणुकीसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

गेल्या काही दिवसांत कलम ५५, ५६, ५७ मुंबई कायदा अंतर्गत २०४ व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे, कलम १०७ सीआरपीसी अंतर्गत ६ हजार ०२९, कलम ११० सीआरपीसी अंतर्गत १ हजार ६६५, कलम १०९ सीआरपीसी अंतर्गत ४२३ जणांचे जातमुचलका घेण्यात आले आहे. कलम १४९ सीआरपीसी अंतर्गत ५ हजार ७६५ जणांना नोटीस बजाविण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता काळात ३९१ अवैध शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून ४ हजार ८३३ जणांना अजामीनपात्र वॉरंट यापूर्वीच बजाविण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईत मतदान करताना मोबाईलवर प्रतिबंध; निवडणूक आयोगाचे आदेश

प्रतिबंधक कायद्यांतर्गत ५१० गुन्ह्यांची नोंद करुन त्यात १० लाख ३९ हजार ८९४ रुपयांची २ हजार ६४८ लिटर बेकायदेशीर दारु तर एनडीपीएस कलमांतर्गत १८७ गुन्हयांची नोंद करुन त्यात ४० कोटी ८२ लाख ५८ हजार ९५५ रुपयांच्या ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत ३५ प्रकरणाची नोंद झाली असून त्यात १० कोटी ५१ लाख ८० हजार ३५२ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून याबाबतची माहिती आयकर विभागाला कळविण्यात आली आहे. आतापर्यंत निवडणुकीसंदर्भात एकून १८ गुन्हे दाखल झाले असून आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी सतरा प्रकरणांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

श्रीलंकेत बॉम्बस्फोट, मुंबईत हाय अलर्ट

श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली असून सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. फोर्स वन, क्युआरटी, असॉल्ट टीम, दहशतवाद विरोधी पथकांना आवश्यक सूचना देण्यात आला असून संबंधित यंत्रणा सतत इंटेलिजन्स टीमच्या संपर्कात आहेत. मुंबई पोलिसांच्या सतरा हजारपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी पोस्टल मत पत्रिकेद्वारे मतदानासाठी स्वत: नोंदणी केली आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -