घरताज्या घडामोडीLok Sabha2024 : दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर अनिल...

Lok Sabha2024 : दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर अनिल परबांची टीका; म्हणाले, आता कोणाचं पोर…

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करताना महायुतीला पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनसे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होती. अशात दादरमधील शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करताना महायुतीला पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनसे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होती. अशात दादरमधील शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (lok sabha election 2024 anil parab slams raj thackeray over shivaji park sabha)

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 17 मे रोजी शिवाजी पार्क येथे सभेसाठी अर्ज केला होता. महापालिकेकडून राज ठाकरे यांच्या सभेला परवानगीही मिळाली आहे. मात्र या सभेवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी टीका केली. शिवतीर्थावर ही सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरं कडेवर खेळणार आहेत? कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे? असे प्रश्न उपस्थित करत अनिल परब यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी “राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही. मग आता जर उमेदवार त्यांचा नाही तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहे? ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवाजी पार्क आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला. सगळं काही रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाहीत. आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत. 22 पोरांसाठी आम्ही शिवतीर्थावर सभा घेत आहे. जर शिवतीर्थावर सभा घेता आली नाही तर इतर आम्ही बीकेसी आणि इतर जागांचा विचार करु”, असे अनिल परब म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राजन विचारे 8 वर्ष गायब, ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय पक्का; मनसेचा टोला

- Advertisement -

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबई मतदारसंघात यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यावरूनही अनिल परब यांनी टीका केली आहे. “ईडी चौकशीला सामोरे जाताना ही माणूस ढसाढसा रडत होती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईतून उमेदवारी मिळाली आहे. तसेच भाजपला विनंती आहे की, रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावे”, अशी टीका अनिल परब यांनी केली.

यंदाच्या लोकसभेत चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नाशिक मतदारसंघात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित केली. त्यावरही अनिल परब यांनी टीका केली आहे. “हेमंत गोडसे यांना येथे नाशिकमध्ये कुठेही फायदा होणार नाही. सगळ्यांनी तिथे आपली जागा आहे असा आग्रह केला होता त्याचा फटका गोडसे यांना बसेल. प्रत्येकाला आपला उमेदवार नाशिक मध्ये द्यायचा होता”, असे अनिल परब म्हणाले.


हेही वाचा – Sangli Lok Sabha 2024 : काँग्रेसच्या अल्टिमेटमनंतर ही माघार नाही; विशाल पाटलांवर कारवाई निश्चित

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -