घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : अमोल कोल्हेंच्या दाव्यावर भुजबळांचे स्पष्टीकरण, म्हणाले - विचारले...

Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंच्या दाव्यावर भुजबळांचे स्पष्टीकरण, म्हणाले – विचारले होते पण…

Subscribe

छगन भुजबळ हे शिरूर लोकसभेतून निवडणूक लढले असते, असा दावा मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर याबाबत भुजबळांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नाशिक : बुधवारी (ता. 24 एप्रिल) शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभेत मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांची प्रचारसभा पार पडली. या प्रचार सभेत त्यांनी शिरूर लोकसभेतून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला होता, असा गौप्यस्फोट केला. ज्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. कोल्हेंच्या या दाव्यावर आता स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी दुजोरा दिला आहे. पण त्यांच्याकडून याबाबत नेमकी त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Chhagan Bhujbal explanation on Amol Kolhe claim)

खासदार अमोल कोल्हे यांच्या दाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत म्हटले की, नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. कारण जर का मी शिरूर लोकसभेतून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता, मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे भुजबळांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली, म्हणाले…

तसेच, छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबतही त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले. ते याबाबत म्हणाले की, मला उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे असे नाही. लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करत असतात. सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत.

- Advertisement -

वडेट्टीवार यांचे आभार…

काही दिवसांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक केले होते. छगन भुजबळ हे दिल्लीत गेले असते तर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली त्याचा बदला त्यांना घेता आला असता, असे म्हणाले होते. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, वडेट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणून ते बोलले असतील. पक्षाच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाहीत. मी नाशिकमधून निवडणूक लढलो असतो तर जिंकून आलो असतो, असे या निमित्ताने पुन्हा एकदा भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabah 2024 : घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून मोठं आश्वासन


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -