घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024: बारामतीबाबत फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद...; जयंत पाटलांचा पलटवार

Lok Sabha 2024: बारामतीबाबत फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद…; जयंत पाटलांचा पलटवार

Subscribe

पुणे: फडणवीसांनी बारमतीबाबत केलेलं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. सर्वांना माहीत आहे की, बारामतीची लढाई कोणाविरुद्ध आहे. त्यांचा केवळ नरेटीव्ह बदलण्याचा प्रयत्न असू शकतो, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. जयंत पाटील सध्या पुण्यात आहेत. यावेळी मोदी बागेतून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis statement on Baramati is ridiculous Jayant Patil counterattack)

काय म्हणाले जयंत पाटील?

देवेंद्र फडणवीस यांचे हे विधान हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्या विरोधात आहे, हे बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीकर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्याच पद्धतीने देतील. मात्र, यामध्ये नरेटिव्ह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. कदाचित सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना समोर आली असेल. त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न असेल, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

विरोधकांकडे भरपूर घबाड- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी एका सभेत बोलताना हेलिकॉप्टरने मतदार आणू, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, हेलिकॉप्टरने मतदार आणू म्हणजे मतदारांची सर्व व्यवस्था करायची ठरवलेली दिसत आहे. आमच्या विरोधकांकडे भरपूर घबाड असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी असावी. आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत, हे यावरून दिसते. आम्ही जनतेच्या जिवावर निवडणुकांना सामोरे जात आहोत. मला विश्वास आहे, महाराष्ट्राची जनता याचा विचार नक्की करेल, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

पाटलांना पक्षात कोणीही विचारत नाही- फडणवीस 

जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी जयंत पाटील हे सध्या असंबद्ध आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटात त्यांना कोणीही विचारत नाही. ते पक्षाच्या कोणत्याच कामांत दिसत नाहीत. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे वगळता कोणीही दिसत नाही, असं म्हणत फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

(हेही वाचा :Lok Sabha Election 2024 : सचिन साठेंचा ठाकरे गटात प्रवेश, क्रांती सेनेच पाठबळ)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -