घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: कल्याणची जागा डॉ. श्रीकांत शिंदे हेच लढवणार; फडणवीसांनी केलं...

Lok Sabha 2024: कल्याणची जागा डॉ. श्रीकांत शिंदे हेच लढवणार; फडणवीसांनी केलं स्पष्ट

Subscribe

कल्याणची जागा डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं लढवणार, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

नागपूर: लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. असं असलं तरीही महायुती आणि मविआमध्ये अनेक जागांवरून तिढा कायम आहे. त्यातच महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट यांची कल्याणची जागा भाजपा लढवणार असं म्हटलं जात होतं. यावरून राजकारण रंगलं होतं. असं असतानाच आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कल्याण मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हे डॉक्टर श्रीकांत शिंदेंच असणार आहेत. त्यांना महायुतीतील सर्व पक्ष साथ देऊन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. म्हणजे आता कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024 Kalyan s seat Dr Srikanth Shinde will fight only Devendra Fadnavis clarified)

- Advertisement -

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील, भाजपाचा पाठिंबा असेल, मोठ्या मतांनी निवडून आणू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. त्यावेली त्यांनी ही घोषणा केली. श्रीकांत शिंदे यांनी आधीच प्रचाराला सुरूवात केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis on Kalyan)

भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप-आमची जी बृहद युती आहे, त्यांना निवडून आणेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : सचिन साठेंचा ठाकरे गटात प्रवेश, क्रांती सेनेच पाठबळ)

श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटवर सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. यंदा त्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे या उमेदवार आहेत.

कल्याण डोंबिवलीची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना मिळाली तर भाजपाचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही, असा इशाराच भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात महायुतीत काही धुसफूस पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -