घरमहाराष्ट्रLok Sabha : महाविकास आघाडीत नाही तर महायुतीत बिघाडी; संजय राऊत स्पष्टच...

Lok Sabha : महाविकास आघाडीत नाही तर महायुतीत बिघाडी; संजय राऊत स्पष्टच बोलले

Subscribe

आमच्या आघाडीत कोणतीही बिघाडी नाही आहे. बिघाडी मला समोर (महायुतीत) दिसत आहे. त्यांच्याकडे अजून जागा वाटप झालेलं नाही आहे. जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार होते, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. परंतु महाविकास आघाडीत सर्व ठीक सुरू आहे. त्यामुळे आम्ही उद्या एकत्र पत्रकार परिषद घेत जनतेला सामोरे जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

मुंबई : आमच्या आघाडीत कोणतीही बिघाडी नाही आहे. बिघाडी मला समोर (महायुतीत) दिसत आहे. त्यांच्याकडे अजून जागा वाटप झालेलं नाही आहे. जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार होते, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. परंतु महाविकास आघाडीत सर्व ठीक सुरू आहे. त्यामुळे आम्ही उद्या एकत्र पत्रकार परिषद घेत जनतेला सामोरे जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले. (Lok Sabha Election 2024 Maha Vikas Aaghadi is not in the lead but Maha yuti failure Sanjay Raut maharashtra politics)

संजय राऊत म्हणाले की, उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आमच्या भावना या एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे उद्याच्या शुभमुहूर्तावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि महाविकास आघाडीतले आमचे सर्व घटक पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय, नरीमन पॉईंट इथे 11 वाजता होईल. महाविकास आघाडीतली पुढील दिशा, झालेलं जागावाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य गोष्टींसंदर्भात आमचे प्रमुख नेते माहिती देतील, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Parakala Prabhakar: मोदी पुन्हा आले, तर कधीही निवडणुका होणार नाहीत; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा

नाना पटोले म्हणतात की, टोकाची भूमिका ठाकरे गटाने घेऊ नये. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीमधले सर्व किरकोळ वाद मिटले आहेत. कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आघाडी किंवा युतीमध्ये जागावाटपात एका किंवा दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांची जी भूमिका असते, त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागलं. मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो. त्यामुळे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर त्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. काही ठिकाणी सीपाआयएम, सीपाआय यांना काही जागासंदर्भात आग्रह होता. त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्ग काढलेला आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहेत. वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन महायुती होत असते. कार्यकर्त्यांचा मन राखणं ही प्रत्येक नेत्यावर फार मोठी जबाबदारी असते. पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सर्व विषय संपलेले आहेत. म्हणूनच आम्ही ठरवलं की, सर्वांनी एकत्र येऊन उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जनतेसमोर जाऊया. त्यानुसार उद्या 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेली आहे.

 हेही वाचा – Lok Sabha : एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा; गिरीश महाजनांची सडकून टीका

महाविकास आघाडीत नाही तर महायुतीत बिघाडी

महायुतीवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत सर्व ठीक आहे, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद होत आहे. आमच्या आघाडीत कोणतीही बिघाडी नाही आहे. बिघाडी मला समोर (महायुतीत) दिसत आहे. त्यांच्याकडे अजून जागा वाटप झालेलं नाही आहे. जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार होते, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. परंतु महाविकास आघाडीत सर्व ठीक सुरू आहे. त्यामुळे आम्ही उद्या एकत्र पत्रकार परिषद घेत जनतेला सामोरे जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -