घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : ठाकरे भेटत नाहीत म्हणून बाहेर पडले, आता मतदारसंघही...

Lok Sabha 2024 : ठाकरे भेटत नाहीत म्हणून बाहेर पडले, आता मतदारसंघही नाही; वडेट्टीवारांची शिंदेंवर टीका

Subscribe

lok sabha election 2024 लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. अनेक मतदारसंघात जागावाटपही करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात 2022 मध्ये अनेक राजकीय भूकंप झाले. शिवसेनेत बंडखोरी करत सध्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे हे भेटत नाहीत आणि अर्थमंत्री अजित पवार हे स्वत:चा म्हणजेच राष्ट्रवादीच्या पक्षाला सर्वाधिक निधी देत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला होता. मात्र आता हाच मुद्दा घेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (lok sabha election 2024 mva opposition leader vijay wadettiwar slams cm eknath shinde)

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. अनेक मतदारसंघात जागावाटपही करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या लोकसभेत (lok sabha election 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडतेय, ती म्हणजे उमेदवारी जाहीर केल्यानंतर पन्हा उमेदवारी पुन्हा काढून त्या जागेवर नवा उमेदवार जाहीर करणे. आणि याच घटनेवरून आता विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : भुजबळांची उमेदवारी पक्की? कुटुंबीयांकडून बँकेचं थकीत कर्ज भरण्यास सुरुवात

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याव टीका केली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ना घर का ना घाट का अशी वेळ आली आहे. उद्धव ठाकरे भेटत नाही, अशी सबब सांगून शिंदे बाहेर पडले होते. पण आता त्यांना लोकसभेचे मतदारसंघही मिळत नाहीत. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांचे अनेक आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्का असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते खासगीत असे बोलत आहेत. याचाच अर्थ असा आहे की, विरोधक गोंधळलेले आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गटात अस्वस्थतता असून उमेदवार निवडीसंदर्भात त्यांची दमछाक होत आहे. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात तरी महायुतीचा विजय रथ रोखेल”, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून वाद सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात (lok sabha election 2024) महाविकास आघाडीतील शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसकडून विरोध होत आहे. याबाबत विजय वडेट्टीवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देताना “सांगलीच्या जागेबाबत आता वाद घालण्यात अर्थ नाही. सांगली मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचा दावा होता. पण आता आम्ही हा विषय ताणून धरणार नाही. आमचे पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेणार आहे. त्यानुसार आम्ही काम करू. परंपरागत जागा दुसऱ्या पक्षाला गेल्यानंतर सुरुवातीला थोडी नाराजी असते. पण ती दूर करण्याचा प्रयत्न करू”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha 2024: वंचितला धक्का! या मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद, कारण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -