घरमहाराष्ट्रSanjay Raut : ...तरीही सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली; राऊतांकडून काँग्रेसवर निशाणा

Sanjay Raut : …तरीही सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली; राऊतांकडून काँग्रेसवर निशाणा

Subscribe

काँग्रेसचे सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा, अशी विनंती केली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, विश्वजित कदम किंवा विशाल पाटील सांगलीत काम करत आहेत, तरीही गेल्या काही वर्षांपासून त्याठिकाणी जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे.

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले. सांगली लोकसभा ही ठाकरे गटासाठी सुटल्याने काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेमंडळींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा, अशी विनंती केली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, विश्वजित कदम किंवा विशाल पाटील सांगलीत काम करत आहेत, तरीही गेल्या काही वर्षांपासून त्याठिकाणी जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे. (Lok Sabha Election 2024 Vishwajit Kadam or Vishal Patil is working in Sangli yet communalist forces have gained strength there over the past few years Sanjay Raut targets Congress)

संजय राऊत म्हणाले की, विश्वजित कदम किंवा विशाल पाटील असतील त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो. ते काँग्रेस पक्षाचे जुने जानते कार्यकर्ते आहे. सांगलीत ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत. तरीही गेल्या काही वर्षांपासून सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे. प्रत्यक्ष सांगलीमध्ये विधानसभेला संघाचा माणूस निवडून येतो. मिरजेत संघाचा माणूस निवडून येतो. दंडली घडवल्या जातात. हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. त्यामुळे भाजपाशी त्याठिकाणी टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार लढणं गरजेचा आहे, ही जनभावना आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचं आहे; संजय राऊतांनी साधला निशाणा

संजय राऊत म्हणाले की, सांगलीत परंपरेने काँग्रेस काम करत आहे. वसंतदादा पाटील किंवा इतर प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्षे काम करत आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की, या शक्तींशी दोन हात करायचे असतील तर तिथे शिवसेना ठाकरे गट हवा. म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना ठाकरे गट उभा आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षाने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने सुद्धा सांगलीची जागा शिवसेनेला सोडल्यावर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही आदर करू आणि भविष्यामध्ये त्यांच्यासाठी काय करता येईल, ते पाहू.

- Advertisement -

48 उमेदवारांसाठी आम्ही एकत्र काम करणार (We will work together for 48 candidates)

वर्षा गायकवाड नाराज आहेत, त्या मातोश्रीवर भेटायला येणार आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, ते म्हणाले की, आम्ही सर्व जागा एकत्र लढत आहोत. आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळामामा म्हात्रे उभे आहेत. आम्हाला एकत्र काम करायचं आहे, त्यामुळे ते माझ्यासोबत इथे आहेत. आम्ही असं म्हणत नाही की, भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याला कशी उमेदवारी मिळाली? असा प्रश्न उपस्थित संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा किंवा काँग्रेसचा असला तरी 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत. 48 उमेदवारांसाठी आम्ही एकत्र काम करू. वर्षा गायकवाड यांच्या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा – Politics : कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशाला कृषिमंत्री नाही; अमोल कोल्हेंनी लगावला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -