घरताज्या घडामोडीLok Sabha Election : दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानेच मोदींबद्दल आस्था कमी...

Lok Sabha Election : दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानेच मोदींबद्दल आस्था कमी – शरद पवार

Subscribe

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या प्रत्यक्ष कृतीत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आस्था कमी होताना पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या प्रत्यक्ष कृतीत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आस्था कमी होताना पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. तसेच, लोकं मनमोहन सिंग यांची 10 वर्ष आणि मोदींची 10 वर्ष याची तुलना करतात, असेही वक्तव्य शरद पवार यांनी केले. (Lok Sabha Election 2024 NCP Sharad Pawar Group Leader Sharad Pawar Slams PM Narendra Modi)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्या प्रत्यक्ष कृतीत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आस्था कमी होताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींचा जो स्वभाव आहे, तो बेछूट पणाणे बोलायचा आहे. पण ते झेपेल का नाही? सरकारची आजची स्थिती आहे का नाही? याबाबत कोणताही विचार न करताच ते अनेक गोष्टी करत असतात”, अशा शब्दांत शरद पवारांनी पंतप्रधानांवर टीका केली.

- Advertisement -

याशिवाय, “2014 साली त्यांनी अनेक गोष्टी जनतेच्या समोर मांडले. त्यावेळी बऱ्याच निर्णयांवर टीका करण्यात आली होती. आज तेच निर्णय पंतप्रधान मोदीच स्वत: डावलायचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांना त्यांचा विरोधाभास दिसत आहे. परिणामी लोकं नाराज झाली आहेत”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे, “लोकं मनमोहन सिंग यांची 10 वर्ष आणि मोदींची 10 वर्ष याची तुलना करतात. मनमोहन सिंग यांचे एक वैशिष्ट्य होते, शांततेत गाजावाजा न करता काम करणे आणि निकाल देणे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकाल तर माहीत नाहीत. पण त्यावर चर्चा भाष्य टीकाटीपण्णी यामध्येच त्यांचे लक्ष असते. त्यामुळे लोकं आता विचार करत आहेत”, असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : नरेश म्हस्के यांच्या विजयाचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -