घरक्राइमPune Crime : प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात 11वीच्या मुलीवर कोयत्याने हल्ला; आरोपी अटकेत

Pune Crime : प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात 11वीच्या मुलीवर कोयत्याने हल्ला; आरोपी अटकेत

Subscribe

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरुगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात एका इसमाने महाविद्यालयीन विद्यार्थीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या सुभाषनगर येथील गल्लीत घडला.

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरुगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात एका इसमाने महाविद्यालयीन विद्यार्थीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या सुभाषनगर येथील गल्लीत घडला. महेश सिद्धप्पा भंडारी (22) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये ही घटना घडली. (Pune Crime Attempt To Attack On Young Girl With Koyata In Pune City)

नेमकं प्रकरण काय?

एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर आरोपी महेश सिद्धप्पा भंडारी याचे प्रमे होते. पण हे प्रेम एकतर्फी असल्याने हा वाद झाल्याचे समजते. कारण संबंधीत मुलीवर महेशचे प्रेम होते. पण ती मुलगी बोलत नव्हती आण तीने प्रेमसंबंधही संपवले होते. याच रागात महेशने पीडित मुलीला भररस्त्यात गाठत तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरून येत सुभाषनगर येथील गल्ली तिला गाठले. पण त्या महिलेने आरडाओरड केल्याने दुचाकीवरून आलेल्यांनी तेथून पळ काढला. यावेळी त्याने एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकवले आणि कोयता फेकत दहशत निर्माण करण्याता प्रयत्न केला.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपी महेश याला तळजाई टेकडी परिसरातून अटक केली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता मुलगी बोलत नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने सांगितले. सद्यस्थितीत महेशलाच पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अद्याप दुसरा व्यक्ती फरार आहे. त्याचा पोलीस तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी MPSC पास दर्शना पवार हिची एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पुण्यातील पेरुगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी जमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे ती युवती वाचली.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime : पोलीस निरीक्षकाच्या हफ्तेखोरीला कंटाळत व्यावसायिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -