घरमहाराष्ट्रLoksabha 2024: माढ्याचा तिढा आज सुटणार? निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भुजबळांचं भाष्य, म्हणाले...

Loksabha 2024: माढ्याचा तिढा आज सुटणार? निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भुजबळांचं भाष्य, म्हणाले…

Subscribe

पुणे: अजित पवार गटाची आज पुण्यात आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीत माढ्याचा तिढा सुटणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच प्रत्येकाला लोकसभेची जबाबदारीही समजून सांगितली जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. (Loksabha 2024 Madha Solapur rift will end today Chhagan Bhujbal s comment on entering the election arena said)

या बैठकीला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भाष्य केलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: भुजबळांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सांगितलं असल्याचं सांगितलं असल्याचा प्रश्न छगन भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की आता बैठकीला जात आहे. त्या बैठकीत आमच्यावर जी जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू. तसंच, मी दिल्लीला गेलेलो नाही. त्यामुळे तिकडे काय झालं, हे मला माहिती नाही. जे दिल्लीला गेले होते, त्यांच्याकडून मी माहिती घेतो, अशी मिष्किल टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

उमेदवारीसाठी वरिष्ठांवर दबाव?

उमेदवारीसाठी भुजबळ कुटुंबियांकडून वरिष्ठांवर दबाव आणला जात आहे का? असं विचारला असता भुजबळ यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, आमच्याकडून असा कोणताही दबाव आणण्यात आलेला नाही. 1 टक्काही आम्ही दबाव आणलेला नाही, असं भुजबळांनी यावेळी सांगितलं.

प्रत्येक उमेदवार आपल्याच पक्षातून लढणार

छगन भुजबळ यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाईल, असं म्हटलं जात आहे. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा त्याच्याच पक्षाकडून लढणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, त्यामुळे मी भाजपाकडून उभा राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी घेतली.

- Advertisement -

(हेही वाचा: Amol Kirtikar : शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -