घरताज्या घडामोडीAmol Kirtikar : शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स

Amol Kirtikar : शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य लोकसभा उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे. आजच ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स अमोल किर्तीकर यांना बजावण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य लोकसभा उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे. आजच ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स अमोल किर्तीकर यांना बजावण्यात आला आहे. या ईडीच्या समन्समुळे अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Amol Kirtikar ED summons to Amol Kirtikar of Shiv Sena Thackeray group)

कोरोना महामारीत झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावल्याचे समजते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी हे समन्स देण्यात आले असून आज (27 मार्च) सकाळी 11:00 वाजता चौकशीसाठी बोलवले आहे. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांच्यासोबत अमोल कीर्तिकर यांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलवले आहे.

- Advertisement -

खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधीच सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमोल कीर्तिकर यांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे आज 11 वाजता चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर कीर्तिकरांची किती तास चौकशी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे थोड्याचे वेळात शिवसेनेच्या ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

अमोल कीर्तिकरांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर केली आहे. आज अमोल कीर्तिकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच ईडीकडून आलेल्या समन्समुळे ठाकरे गटासमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha 2024: प्रकाश आंबेडकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंबेडकरांच्या मनात काहीतरी वेगळंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -