घरदेश-विदेशLoksabha Election 2024 : 96.88 कोटी जनता ठरवणार कोण सत्तेत बसणार

Loksabha Election 2024 : 96.88 कोटी जनता ठरवणार कोण सत्तेत बसणार

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका घेत आहे. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांचा अहवाल जारी केला आहे. देशातील 2.63 कोटी नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली असून या वर्षी एकूण 96.88 कोटी लोक मतदान करणार आहेत. (Loksabha Statistics released by Election Commission 96.88 crore people will decide who will sit in power)

हेही वाचा – Maratha Reservation : कायदा आला तर…; विशेष अधिवेशनाआधीच सदावर्तेंचा सरकारला इशारा

- Advertisement -

निवडणूक आयोगाने सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित 2024 अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये मतदारांशी संबंधित डेटा सादर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मते, मतदान यादीत 2.63 कोटींहून अधिक नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 1.41 कोटी महिला मतदार आहेत.
त्यांची संख्या नोंदणीकृत पुरुष मतदारांपेक्षा (1.22 कोटी) 15 टक्क्यांनी अधिक आहे. तर सुमारे 88.35 लाख दिव्यांग मतदारांची मतदार यादीत नोंद आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदारांचा मतदान यादीत समावेश करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याशिवाय, लिंग गुणोत्तर देखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे. याशिवाय 1 कोटी 65 लाख 76 हजार 654 मृतांची नावे, अन्य ठिकाणी स्थलांतरित आणि बनावट मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये 67 लाख 82 हजार 642 मृत मतदार, 75 लाख 11 हजार 128 गैरहजर मतदार आणि 22 लाख 5 हजार 685 बनावट मतदारांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : महाराष्ट्राची परिस्थिती पाकिस्तानसारखी होतेय; सुप्रीम कोर्टाने टीप्पणी केल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

निवडणूक आयोगाने सांगितले की, 17 वर्षांवरील 10.64 लाख मतदारांनी आपली नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या 3 तारखांना 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. पक्षांना पाठवलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक पॅनेलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स, पॅम्प्लेट वाटणे आणि घोषणाबाजी करण्याबद्दल शून्य सहनशीलता व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -