घररायगडखालापूरात प्रथमच रंगली बैलगाडा शर्यत

खालापूरात प्रथमच रंगली बैलगाडा शर्यत

Subscribe

मथुर आणि सोन्याची हवा, हजारो प्रेक्षकांची गर्दी

खोपोली-: शिवजयंतीचे औचित्य साधून जयंती दिनाच्या पुर्व संध्येला शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी खालापूरात पहिल्यांदाच जंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. (Bullock cart race on the occasion of Shiv Jayanti UBT SHIVSENA) बैलगाडा शर्यतीत मथुर आणि सोन्या या दोघांनी मैदान गाजवत उपस्थितांची मने जिंकली. या शर्यतीत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून २०० पेक्षा जास्त बैलगाडा स्पर्धकांसह ३० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून तसेच जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे व सरपंच ग्रुप यांच्या पुढाकारातून आणि भारतीय बैलगाडा संघटनेच्या मान्यतेने नारंगी येथील केसरी मैदानात भव्य बैलगाडा शर्यत संपन्न झाली.महाराष्ट्रातील फेमस मथुर,सोन्याने मैदान गाजवत प्रेक्षकांची मने जिंकली.

- Advertisement -

याप्रसंगी उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत,सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे,सल्लागार नवीन घाटवल,खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे,कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे,महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी,सल्लागार एस.एम.पाटील,आत्माराम पाटील,संपर्कप्रमुख उमेश गावंड,माजी उपसभापती रमेश पाटील,युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील,चिटणीस प्रशांत खांडेकर,तालुका अधिकारी महेश पाटील, उत्तम भोईर,नितीन पाटील,सरपंच अविनाश आमले,माजी सरपंच दिनेश घाडगे,प्रविण पाटील,उप तालुकाप्रमुख अशोक मराजगे,महिला उपजिल्हा संघटीका अनिता पाटील,शैला भगत,कर्जत संपर्कप्रमुख सुदाम पवाळी,तालुका संघटक बाबू घारे,युवासेना तालुका सचिव अ‍ॅड.संपत हडप,माजी सभापती पंढरीनाथ राऊत, उप तालुकाप्रमुख बाजीराव दळवी,विभागप्रमुख योगेश दाभाडे,सरपंच समीर साळोखे,योगेश थोरवे,योगेश घोलप आदी उपस्थितीत होते.

थरार बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम तीन क्रमांकांना दुचाकी बक्षीस ठेवण्यात आली असता प्रथम क्रमांक विर संदेश देशमुख (नारंगी),द्वितीय सममरा प्रतीक मढवी (नेरे पनवेल),तृतीय ऋषिकेश पाटील (माजगाव)या बैल जोडी मालकांना देण्यात आले.

- Advertisement -

इतर बैलगाडा मालकांना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या बैलगाडा शर्यती यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच दिनेश घाडगे,भारतीय बैलगाडा संघटनेचे खालापूर तालुकाध्यक्ष समीर पाटील,प्रवीण पाटील,राजू कडव,मनसुर वनडे,साई भोसले,शैलेश शिर्के,महेश पांचाल,अभी घोंगे,केदार पाटील,विवेक पाटील,नितीन भोइर,समीर पाटील,चेतन देशमुख,किरण देशमुख,रुपेश देशमुख, अमित पाटील,प्रदीप हेलंडे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह असंख्य बैलगाडा शर्यत प्रेमींनी मेहनत घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -