घरमहाराष्ट्रनाशिकमुलाच्या उपचारासाठी कुबेरेश्वर धामला गेले, मात्र परतताना तीन वर्षीय मुलावर काळाचा घाला

मुलाच्या उपचारासाठी कुबेरेश्वर धामला गेले, मात्र परतताना तीन वर्षीय मुलावर काळाचा घाला

Subscribe

अमोघ हा जन्माला आल्या नंतर सहा महिन्यांचा झाला तरी त्याच्या पायात ताकद येत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक तज्ञ डॉक्टरांकडे फेऱ्या सुरू केल्या. मात्र यात कोणतीही प्रगतीही होत नव्हती.

मध्य प्रदेशातील सिहोरच्या कुबेरेश्वर धाम इथे सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणी लाखो भाविकांची दुर्दशा सुरू आहे. पुरेशा व्यवस्थेअभावी लाखो भाविकांना आता मोकळ्या जागेवर रात्र काढावी लागत आहे. दिवसा उन्हापासून वाचण्यासाठी ते साडीच्या झोपड्या करून जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. भाविक खाण्यापिण्यासाठी इथे तिथे फिरताना दिसत आहेत. याच रुद्राक्ष महोत्सवासाठी जळगावमधील कुटूंब गेले होते. गुरुवारी चेंगराचेंगरी झाल्याने हे कुटुंब पायी घराकडे निघाले. पण हे कुटूंब घरी येताना त्यांच्या हाती तीन वर्षीय मुलाचा मृतदेह होता. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कुबेरेश्वर धाम येथे १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान रुद्राक्ष वितरण महोत्सव व शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांनी देशभरातील भाविकांना सिहोर येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. निमंत्रणानंतर पहिल्याच दिवशी २० लाखांहून अधिक भाविक कुबेरेश्वर धाममध्ये पोहोचले. अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने भाविक आल्याने संपूर्ण यंत्रणा कोलमडली. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भट कुटंबीय सुद्धा या महोत्सवाला गेले होते. विनोद भट हे दोन्ही मुल व त्यांच्या पत्नीसह खासगी वाहनाने मंगळवारी सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सवासाठी गेले होते. तेथे गुरुवारी चेंगराचेंगरी झाल्यानंतर भट कुटुंबीय उत्सव स्थळापासून पायीच वाहनाकडे निघाले होते. मात्र गर्दीमुळे वाट काढत असताना आईच्या कडेवर असलेल्या तीन वर्षाच्या अमोघची प्रकृती ढासळली. यावेळी पिण्यास पाणी ही न मिळाल्याने आणि गर्दीचे धक्के खावे लागल्याने अमोघची प्रकृती गंभीर झाली. अमोघच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेत त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अमोघचा मृत्यु दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेमुळे भट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोघला सेरेब्रल पाल्सी हा मेंदूविकार असल्याचे सांगितले जात आहे. जळगावमधील शनिपेठ भागात हे भट कुटूंबीय राहत होते. अमोघ हा जन्माला आल्या नंतर सहा महिन्यांचा झाला तरी त्याच्या पायात ताकद येत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक तज्ञ डॉक्टरांकडे फेऱ्या सुरू केल्या. मात्र यात कोणतीही प्रगतीही होत नव्हती. या सर्व गोष्टीला कंटाळून अखेर भट कुटुंबाने अध्यात्मिक मार्ग अवलंबला. याचसाठी ते मध्यप्रदेशात असलेल्या सीहोर येथील रुद्राक्ष महोत्सवात गेले होते. परंतू उपचार तर झाले नाही पण आपल्याला मुलाला गमावण्याची वेळ या कुटूंबावर आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -