घरमहाराष्ट्रमालवण, कुडाळमध्ये देखील राम नामाचा गजर

मालवण, कुडाळमध्ये देखील राम नामाचा गजर

Subscribe

मालवण, कुडाळमध्ये देखील शिवसेनेच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्यावतीने मालवणातील भरड दत्तमंदिर आणि बसस्थानकानजीकच्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली. यानिमित्ताने शिवसैनिकांनी मोटरसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ‘हर हिंदू कि यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशा घोषणा देण्यात आल्या. कुडाळमध्ये देखील भैरव मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. राम मंदिराच्या निर्मितीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्या गाठली. यावेळी सुमारे ५० हजार शिवसैनिक देखील अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. या निमित्ताने शिवसेनेने शनिवारी सर्वत्र महाआरतीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आज अर्थात शनिवारी संपूर्ण मालवण शहर भगव्या झेंड्यांनी फुलून गेले होते. मालवणमधील महाआरतीसाठी जिल्हाप्रमुख आणि आमदार वैभव नाईक स्वतः उपस्थित होते. यावेळी वैभव नाईक यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेवर जोरदार टीका केली. २०१४ मध्ये आपण नारायण राणे यांचे आव्हान पेलले होते. त्यामुळे निलेश राणे यांचे आव्हान आपण मानत नसून निलेश राणे याना आपले आव्हान उभे असल्याची टीका त्यांनी केली. अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत गेले असून त्यांच्या दौऱ्याला सिंधुदुर्गवासियांचा पाठींबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -