घरमहाराष्ट्रई-टॉयलेट्सला महाडकरांची नापसंती !

ई-टॉयलेट्सला महाडकरांची नापसंती !

Subscribe

वापराच्या अज्ञानामुळे आत अडकले

महाड नगरपालिकेने महाड व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेल्या ई-टॉयलेट्सला सध्या तरी नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. त्यातच वापराचे ज्ञान नसल्याने आतच अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. आत अडकून पडण्याच्या भीतीने नागरिक या टॉयलेट्सचा वापर करत नाहीत. त्यातच या ई टॉयलेट्सची जागा चुकली असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये चांगले नाव कमावले व पुरस्कारही मिळवले. अशाच स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी पालिकेने महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लायन्स क्लब या ठिकाणी दोन ई-टॉयलेटची उभारणी केली आहे. मोठ्या शहरात असणारी ही टॉयलेट्स महाडमध्ये पालिकेने उभी करुन आधुनिकतेकडे पाऊल टाकले. पण त्याकडे नागरिकांनी सपशेल पाठ फिरवली आहे. या ई- टॉयलेटची स्वच्छता आधुनिक पद्धतीने होत असली तरी त्यातून दुर्गंधी सुटूत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

- Advertisement -

महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आणि या ठिकाणी बाजारपेठ आणि इतर सरकारी कार्यालय असल्याने बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांची व प्रवाशांची येथे कायम वर्दळ असते. महाडमध्ये छ. शिवाजी चौक येथे स्वच्छता गृह आहे. मात्र याठिकाणी स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. नागरिकांची गैरसोय होत होती. स्वच्छतागृहाची असणारी गरज लक्षात घेता पालिकेने या ठिकाणी दोन ई-टॉयलेट्स बांधली आहेत. याचा वापर ऑगस्टपासून सुरू करण्यात आला. परंतु, ग्रामीण भागातील नागरिकांना या टॉयलेट्सबाबत व्यवस्थित ज्ञान नाही. त्यामुळे याठिकाणी येणारे नागरिक र् कोणतेही बटण दाबतात. दरवाजांची मोठ्याने उघडझाप करतात.त्यामुळे एक टॉयलेट नादुरुस्त झाला आहे. हे टॉयलेट आधुनिक असल्याने त्याचे सेंसर सध्या काम करत नाही. त्यामुळे एक टॉयलेट नागरिकांकरिता बंद करण्यात आला आहे.

असे आहे ई-टॉयलेट

ई-टॉयलेट पूर्णपणे स्वयंचलित असल्याने त्यांचा वापर योग्य तर्‍हेने करावा लागतो. या ठिकाणी बॉक्समध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडण्यापासून ते पूर्ण स्वच्छता करण्यापर्यंत सर्व कामे स्वयंचलित यंत्रणेने होत असतात. यासाठी काही बटणांचा वापर करावा लागतो. हे ई-टॉयलेट स्वयंचलित असून याची स्वच्छतादेखील सेंसर आधारित आहे.

- Advertisement -

हायमास्टप्रमाणे ई-टॉयलेट्सची जागा चुकली

महाडमध्ये गेल्या काही वर्षापासून मागणी होत असल्यामुळे हायमास्ट बसवण्यात आले आहेत. छ. शिवाजी चौक, चवदारतळे, क्रांतीस्थंभ, आझाद मैदान आदी परिसरात लावण्यात आलेले हायमास्ट चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याने ऐन रात्रीच्या वेळेस यातील काही दिवे बंद ठेण्यात येत आहेत, तर याचा प्रकाशदेखील गरज नसलेल्या ठिकाणी जात आहे. याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यावर पालिकेनेच पालिकेचा नियम धाब्यावर बसवत नाल्यावर काम केले. त्यातच या ई-टॉयलेट्सला आडोसा नसल्याने नागरिक याकडे फिरकत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -