घरBudget 2024Maharashtra Budget Session : अटल सेतूवरून विधानसभेत देशमुख-शेलारांमध्ये श्रेयवादाची लढाई

Maharashtra Budget Session : अटल सेतूवरून विधानसभेत देशमुख-शेलारांमध्ये श्रेयवादाची लढाई

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज अटल सेतूच्या मुद्द्यावरून आशिष शेलार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळाली.

मुंबई : महायुती सरकारने अनेक निर्णय हे गतिमान पद्धतीने घेतले आहेत, असे म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक अर्थात अटल सेतूबाबत महत्त्वाची माहिती देत सांगितले की, महिन्याभरात आठ लाख वाहनांनी या सेतूवरून प्रवास केला आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे शेलार यांच्याकडून सभागृहात सांगण्यात आले. ज्यानंतर या पुलावरून काही वेळासाठी श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळाली. (Maharashtra Budget Session: Battle of Credibility between Anil Deshmukh and Ashish Shelar in Legislative Assembly from Atal Setu)

हेही वाचा… Budget Session : सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; ठाकरे गटाची मागणी

- Advertisement -

अटले सेतूबाबत बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी या पुलासाठीच्या सर्व परवानग्या या केंद्रातून आणल्या. परंतु, विरोधकांनी सत्तेत असताना याबाबत केवळ पेपरवर लिहिले. त्यामुळे विरोधक हे फक्त कागदावरचे वाघ आहेत, पण भाजपा जमिनीवर काम करणारा वाघ आहे. ज्यामुळे कागदी घोडे हे कागदी वाघासमोर नाचवा, आमच्यासमोर ते आणू नका, असा टोलाच आशिष शेलारांनी विरोधकांना लगावला आहे.

तर, विरोधकांनी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून एक जरी परवानगी आणली असेल तर त्याचा पेपर दाखवण्यात यावा, असे आव्हान आशिष शेलारांकडून करण्यात आले. ज्यानंतर या आव्हानाला उत्तर देत विरोधी पक्षातील आमदार अनिल देशमुख म्हणाले की, अटल सेतू सुरू करण्यासाठी सरकारचे अभिनंदन पण यासाठीची पर्यावरण मंजुरी आणण्यासाठीची सुरुवात ही आघाडी सरकार असताना झाली, असे म्हणत यावेळी विरोधकांनी या कामात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

परंतु, यानंतरही आशिष शेलार यांनी भाजपाने अटल सेतूसाठी कशा पद्धतीने परवानग्या मिळवल्या याबाबतची माहिती दिली. याबाबत त्यांनी सभागृहात सांगितले की, अटल सेतूसाठी लागणाऱ्या पर्यावरण खात्याच्या सर्व परवानग्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केंद्रात जाऊन, पंतप्रधानांची भेट घेऊन मंजूर करून घेतल्या आहेत. त्यातही या परवानग्या शक्ती नावाच्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत मिळालेल्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात 8 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याने 14 लाख रुपयांची कमाई सरकारला करता आली आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगतरित्या बैठका घेत हे काम पूर्ण केले आहे, असे सांगत या कामाचे संपूर्ण श्रेय महायुतीच्या सरकारचे असल्याचे म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -