घरदेश-विदेशHimachal Politics: हुश्श... हिमाचलमधील काँग्रेसचं सरकार अबाधित; बहुमताने मांडला अर्थसंकल्प

Himachal Politics: हुश्श… हिमाचलमधील काँग्रेसचं सरकार अबाधित; बहुमताने मांडला अर्थसंकल्प

Subscribe

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर संकट ओढवलं होतं. माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह भाजपचे आमदार बुधवारी सकाळी राज्यपालांची भेट घेत बहुमत चाचणीची मागणीही केली होती.

शिमला : हिमाचल प्रदेशच्या राजकारणात जोरदार हालचालींना वेग आलेला असतानाच काँग्रेसचे सरकार टिकते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आज सकाळी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 15 आमदारांना निलंबित केलं आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पही बहुमताने सादर करण्यात आल्याने सुखू यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळण्याचा धोका पुढील 3 महिन्यांसाठी टळला आहे. (Himachal Political Hush Congress government in Himachal intact Budget presented by majority)

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर संकट ओढवलं होतं. माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह भाजपचे आमदार बुधवारी सकाळी राज्यपालांची भेट घेत बहुमत चाचणीची मागणीही केली होती.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी असतानाही तेथील राजकीय वातावरण तापलेलं होतं. हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. दोन्ही उमेदवारांना 34-34 मते पडली. पण इश्वरचिठ्ठीमध्ये भाजपने बाजी मारली.

हेही वाचा : Jitendra Awhad : मोदी जगभरात लोकशाहीच्या नावाने ढोल बडवतात, पण…; आव्हाडांची टीका

- Advertisement -

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची हायकमांडकडे मागणी

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बदलण्याची मागणी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी केली आहे. या आमदारांनी काँग्रेस हायकमांडपर्यंत आपले म्हणणे मांडले आहे. हिमाचल प्रदेशातील राजकीय संकट सोडवण्याची जबाबदारी डीके शिवकुमार आणि भूपेंद्र हुड्डा यांच्याकडे देण्यात आली होती.

हेही वाचा : Maharashtra Budget Session : अटल सेतूवरून विधानसभेत देशमुख-शेलारांमध्ये श्रेयवादाची लढाई

सीएम सुखू यांनी केले गंभीर आरोप

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि हरियाणा पोलिसांच्या ताफ्याने 5 ते 6 काँग्रेस आमदारांचे अपहरण करून त्यांना घेऊन गेले, असा आरोप हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मंगळवारी केला. या आमदारांचे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. ‘क्रॉस व्होटिंग’ (पक्षाच्या व्हिपच्या बाहेर मतदान) यावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चिंतेमध्ये राज्यातील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी मतदान संपल्यानंतर काही तासांनंतर हा आरोप झाला. भाजप गुंडगिरी करत आहे, जे लोकशाहीसाठी चांगले नाही, असे मुख्यमंत्री सुखू म्हणाले होते.

या राजकीय घडामोडींनी वेधलं होतं लक्ष

सुखविंदर सिंग सुखू सरकारने आपल्याच आमदारांचा अनेक वेळा अपमान केला, असा आरोप करत काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंग यांनी बुधवारी सकाळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते पुढे म्हणाले, आता हिमाचलमध्ये काँग्रेस पुढे कोठे आहे हे पक्षाच्या हायकमांडला ठरवायचे आहे. लोकांनी मतदान केले म्हणून ते सरकार वाचले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तर याआधी विधानसभेत भाजपा आमदारांनी गोंधळ घातल्याने 15 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. जय राम ठाकूर, विपिनसिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण चंद, इंद्रसिंह गांधी, दिलीप ठाकूर, रणवीर सिंग या 15 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -