घरBudget 2024Maharashtra Budget Session : चर्चा मुंबईची.. पण गांधी-मोदींच्या नावावरून विधानसभेत झाला गोंधळ

Maharashtra Budget Session : चर्चा मुंबईची.. पण गांधी-मोदींच्या नावावरून विधानसभेत झाला गोंधळ

Subscribe

मुंबई : विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबई, ठाणे , पुणे, नाशिक, नागपूर, या शहरांमध्ये महायुती सरकारतर्फे करण्यात आलेली कामे आणि गतिमान विकास याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आभार मानणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलण्याची सुरुवात भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि त्याच्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला, ज्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Budget Session: Debate in Legislative Assembly over names of Narendra Modi and Rahul Gandhi)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : अहंकारापोटी आरे कारशेडचे काम रोखले, आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisement -

अदानींकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलाविले जाते आणि त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जात असल्याचा मुद्दाही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. त्यामुळे यांच्या या वक्तव्यावर भाजपा आमदार अमित साटम, नितेश राणे यांनी हरकत घेत राहुल गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे अखेर विधानसभेचे तालिका अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी भाजपाने मांडलेल्या हरकतीनुसार तो शब्द वगळून कामकाज पुढे चालविले.

काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील झोपट्टीवासियांचा आणि धारावीकरांचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी भाजपावर हल्ला चढविला. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील जेवढी विकास कामांचे उद्घाटन किंवा प्रकल्पांच्या जमिनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिले जाते, असा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा आमदार अमित साटम यांनी म्हटले की, मुंबईच्या प्रश्नावर इथे चर्चा सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा काय संबंध?, राहुल गांधी कुठे तमाशा करतात, हे मी सांगू का, असे म्हणत अमित साटम यांनी वर्षा गायकवाडांवर निशाणा साधला. यानंतर काँग्रेस आणि भाजप आमदारांत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तर वर्षा गायकवाड यांच्या याच वक्तव्यावर भाजपा आमदार आशिष शेलार, नितेश राणे आणि मनोज कोटक यांनीही हरकत घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -