घरमहाराष्ट्रनागपूरAjit Pawar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय- अजित पवार

Ajit Pawar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय- अजित पवार

Subscribe

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या, त्यात स्वच्छतापासून सक्षमीकरणापर्यंतच्या योजना आहेत. मोदींमुळे महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि हजारो कोटींचे कर्ज मिळाले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जात आहे. यासोबतच डोरली येथे आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सक्षमीकरणासाठई काम करणार असल्याचे प्रतिपादन अजित पवांरानी केले. (Ajit Pawar We are working under Modis leadership for the empowerment of women Ajit Pawar)

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या, त्यात स्वच्छतापासून सक्षमीकरणापर्यंतच्या योजना आहेत. मोदींमुळे महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि हजारो कोटींचे कर्ज मिळाले आहे. आम्ही सर्व मोदींच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार आहोत. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, जब आती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है हा शेर म्हणत अजित पवारांनी त्यांच्या भाषणाचा शेवट केला.

- Advertisement -

मोदींची गॅरंटी आपल्यासोबत-गवळी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संबोधनाआधी खासदार भावना गवळी यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारने महिलांसाठी भरपूर काही केले असून, केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्या पाठीशी आहे. मोदींनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिले आहे. मी गेले आठ महिन्यापासून मोदींना बचत गटातील महिलांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये या अशी विनंती करत होती. आज मोदी प्रत्यक्षात यवतमाळमध्ये आले. मोदींची गॅरंटी आपल्या सोबत आहे. यवतमाळची रेल्वे आज प्रत्यक्षात येत आहे, 40 वर्षांपासून आपण रेल्वेची वाट पाहत होतो, ते स्वप्न पूर्ण झाल्याचेही खासदार भावना गवळी म्हणाल्या.

हेही वाचा : Anil Parab : ‘पार्टी विथ डिफरंस’ कशासाठी? आमदारांच्या गैरवर्तनावरून भाजपावर निशाणा

- Advertisement -

सीता मातेचं मंदिर असलेल्या भूमीत नारी वंदन- फडणवीस

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या यवतमाळ मध्ये जगातील एकमेव सीता मातेचं मंदिर आहे तिथं आज मोदींच्या हस्ते नारी वंदन कार्यक्रम होत आहे. साडे पाच लाख बचत गटांना कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मोदी नेहमी म्हणतात फक्त चार जाती आहेत, गरीब, शेतकरी, युवा आणि महिला. आज या चारही जातींना मदत मिळत आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. शिवाय मोदी आवास योजनेअन्वये घरे दिली जाणार आहे, त्यात ही महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. सिंचनाच्या योजनाही देऊन विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर केले जात आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -