घरमहाराष्ट्रभुजबळांची १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सोमय्यांचा दावा

भुजबळांची १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सोमय्यांचा दावा

Subscribe

मरिन ड्राइव्हमधील अल जाब्रिया कोर्ट इमारत बेनामी मालमत्ता म्हणून जप्त

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रावादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. छगन भुजबळ यांची १०० कोटी रुपयांचा बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी आज सकाळी ७ वाजता यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सोमय्यांनी म्हटले की, ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत.

या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग (इन्वेस्टिगेशन) मार्फत मुंबई सेशन कोर्टात दावा दाखल करुन कायदेशीर प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या आणि माहिती अधिकारी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

किरीट सोमय्यांचा दावा

आयकर विभागाने यासंदर्भात मंगळवारी परिपत्रक जारी केले आहे. समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त केली असून ही बेहिशेबी संपत्ती त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीकडून खरेदी केली होती असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच सेशन कोर्टात या बेहिशेबी मालमत्तेच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात असून त्यावर लवकरचं सुनावणी होईल. यामुळे छगन भुजबळांना ७ वर्षापर्यंत शिक्षा देखील होईल असेही किरीट सोमय्या म्हणाले.

मरिन ड्राइव्हमधील अल जाब्रिया कोर्ट इमारत बेनामी मालमत्ता म्हणून जप्त

आयकार विभागाने २० ऑगस्टला मरिन ड्राइव्हमधील अल जाब्रिया कोर्ट इमारत बेनामी मालमत्ता म्हणून जप्त केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यवरील मनी लॉड्रिंग प्रकरणातील पैसे गुंतवण्याच्या संशयातून ईडीने या इमारतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली होती. या १०० कोटी रुपये किंमतीच्या इमारत खरेदीसाठी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे वापरल्याचा ईडीला संशय होता.

- Advertisement -

यात व्यावसायिक अर्शद सिद्धीकी याच्यामार्फत हे पैसे गुंतविल्याचाही ईडीला संशय होता. यानंतर ईडीने त्याचा जबाब नोंदवला. सिद्धकी आणि भुजबळ यांचा पुतण्या समीर यांनी डिसेंबर २०१३ मध्ये या इमारतीचे हक्क असलेल्या राजघराण्यातील व्यक्तींची कुवेतमध्ये जाऊन भेट घेत करारावर चर्चा केली होती. त्यासंबंधीत पुरावेही ईडीला मिळाले होते. याप्रकरणात आता ईडीकडून तपास सुरु होता. मात्र तपास सुरु असतानाच २० ऑगस्टला ही इमारत बेनामी मालमत्ता असल्याचे घोषित करत आयकर विभागाने जप्त केली आहे.


आता शेवट आम्ही करु, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -