घरमहाराष्ट्रआता शेवट आम्ही करु, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा

आता शेवट आम्ही करु, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा

Subscribe

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी मंगळवारी दुपारी नारायण राणेंना अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर राणे समर्थक आणि एकूणच भाजपा समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र त्यादिवशी रात्री उशीरा महाडमधील कोर्टाने राणेंचा जामीन अर्ज मंजूर केला. या परिस्थितीत भाजप नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांसह अनेक भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकार सूडाचे राजकारण करतं असे म्हणत शिवसेनाविरोधात राणेंच्या समर्थनार्थ उभे राहिले. भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नाराय़ण राणे यांना अटक करुन तुम्ही सुरुवात केली, आता आम्ही शेवट करु असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी ते बोलत होते.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांबद्दल बोलतानाच्या सीडी आम्ही उघड केल्या तर हे एकमेकांवर गुन्हे दाखल करतील, अशी परिस्थिती आहे. यापूर्वी खासदार राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकमेकांबद्दल काय बोलायचे हे सर्वांना माहिती आहे. स्वातंत्र्य दिनाचा हीरक महोत्सव व अमृत महोत्सव यातील फरक मुख्यमंत्र्यांना समजत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. या चुकीबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ नये का? अस सवाल शेलारांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरोधात बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीड्या आमच्याकडे आहेत. असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला.

नारायण राणेंना अटक आणि जामीन

नारायण राणेंनी कोणताही गुन्हा केला नाही. महाविकास आघाडी सरकारने नारायण राणेंना मुद्दाल जाणून-बुजून अटक केल्याचे म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला. भाजपा कार्यालयावरील हल्ल्याचा शिवसेनेने तमाशा केला तर आम्ही तांडव करु, पण त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि शिवसेनेची असले असेही शेलार म्हणाले.

- Advertisement -

 

जामीन मिळताच नारायण राणे यांच पहिले ट्वीट, ‘सत्यमेव जयते’

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -