Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Covid-19च्या रडारवर लहान मुले! ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण

Covid-19च्या रडारवर लहान मुले! ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार पार गेली आहे. त्यात आता राज्यातील पालकांची चिंता वाढणारी बाब समोर आली आहे. कोरोनाच्या रडावर लहान मुले असून मार्च महिन्यांत ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. १० वर्षांपर्यंतच्या १५ हजार ५०० तर १० ते २० वयोगटातील ४० हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ती पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावी आहे. यामध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. जानेवारीत १० वर्षांच्या खालील मुलांना कोरोनाचा होणाऱ्या मुलांचे प्रमाणे २००० हजार होते. फेब्रुवारीत २७०० होते. मात्र मार्च महिन्यात थेट १५ हजारांचा टप्पा गाठला आहे.

- Advertisement -

१० ते २० वयोगटातील मुलांना कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण ५,३०० होते. फेब्रुवारीमध्ये ८,००० झाले. त्यानंतर मार्चमध्ये ४०,००० टप्पा पार केला. दरम्यान अजूनही शाळा बंद आहे, ऑफलाईन सर्व काही सुरू आहे. तरी देखील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. पण आता परीक्षाचा काळ असल्यामुळे पालकांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला. मागील २४ तासांत राज्यात ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी २७ हजार ९१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. परंतु, बुधवारी हा आकडा जवळपास दोन हजारांनी वाढला. तसेच बुधवारी २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,००,७२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा विस्फोट! ऑक्टोबरनंतर देशात आढळले सर्वाधिक रुग्ण, मृतांचा आकडा ४०० पार


 

- Advertisement -