घरदेश-विदेशAssembly Election 2021: कडक सुरक्षेत बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता बॅनर्जी...

Assembly Election 2021: कडक सुरक्षेत बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता बॅनर्जी विरोधात सुवेंदु अधिकारी

Subscribe

बंगालमधील नंदीग्राम विधनासभा मतदार संघात आज होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या मतदार संघात तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर भाजपाकडून सुवेंदु अधिकारी यांच्यात टक्कर होताना पाहायला मिळणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदीग्रामसह तमलुक, हल्दिया या मतदारसंघात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात ७३ लाख ४४ हजार ६३१ मतदार नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर बंगालमध्ये ७५ लाख ९४ हजार ५४९ मतदार मतदान करणार आहे. यंदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये EVM मशीनसह वीवीपॅटचा वापर करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला आहे. या टप्प्यात नंदीग्रामकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, त्यामुळे राजकीय युद्धामध्ये मतुआ समाजाचे वर्चस्व असलेल्या या जागांवर टीएमसीचे वर्चस्व असले तरी यावेळी अधिकारी कुटुंबांत कांटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहे. टीएमसीच्या जुन्या पक्षाच्या निष्ठावंतांशी असलेल्या टीएमसीच्या नाराजीचा सामना सुवेंदु अधिकारी यांना करावा लागणार आहे.

- Advertisement -

तर ममतांनी त्यांच्या प्रतिमेसह तथाकथित अपघातात झालेल्या दुखापतीचे वर्णन करण्यास कोणतीही कसर सोडली नाही तर यावेळी सहानुभूती मिळवली. आसाममधील कट्टरवादी प्रतिमेसह सीएएच्या आव्हानांवर भाजपला मात करावी लागणार आहे, असा दावा करून कॉंग्रेसने आसाममधील आपली जुनी प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये साधारण १० हजार ६२० मतदान केंद्र असून यापैकी २ हजार २८७ इतके मतदानकेंद्र संवेदनशील आहे. ३० पैकी ८ जागा आरक्षित असून साधारण १७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये १९ महिला उमेदवार आहे. होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात सर्वात मोठे विधानसभा क्षेत्र दासपूर आहे. याठिकाणी २ लाख ९७ हजार ८४९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर सर्वात लहान विधानसभा क्षेत्र बिशनुपूर असून २ लाख १८ हजार ६९० इतकेच मतदार आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -