घरमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींमुळे नागपूरला मिळणार 'हे' प्रकल्प; फडणवीसांनी दिली माहिती

पंतप्रधान मोदींमुळे नागपूरला मिळणार ‘हे’ प्रकल्प; फडणवीसांनी दिली माहिती

Subscribe

मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग किंवा विदर्भ मराठवाडाच नाही तर उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणाऱ्या महामार्गाचे लोकापर्ण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यासोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट आहेत, यात कालच अजून दोन प्रोजेक्टची भेट पंतप्रधान मोदींनी दिली आहे. मागच्या काळात महाराष्ट्रात सरकार असताना दोन प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते. एक नाग नदीचे शुद्धीकरण आणि रिजीव्हिनीचा प्रोजेक्ट. हा २ हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे. जायका त्याला फंडिंग करणार आहे. त्या प्रोजेक्टलाही कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाली आहे. यासोबत मेट्रोचा फेज टू यालाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागपूरसाठी असा ऐतिहासिक दिवस हा पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून येत आहे, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मविआने त्रुटी पूर्ण न केल्याने हे प्रकल्प रखडले 

नाग नदीचा प्रोजेक्ट असेल किंवा फेज २ चा प्रोजेक्ट असेल, २०१९ साली हे प्रोजेक्ट जेव्हा मान्यतेला आले होते, त्यावेळी छोट्याछोट्या त्रुटी आल्या होत्या, पण महाविकास आघाडीने त्या त्रुटी पूर्ण न केल्याने हे प्रकल्प दोन अडीच वर्ष रखडून राहिले. पण अवघ्या २५ दिवसात आम्ही आल्यानंतर त्या क्वेरिसही पूर्ण केल्या, आणि अवघ्या २५ ते २७ दिवसात केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली ही नागपूरसाठी आनंदाची बाब आहे, असही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान राज्यात लवकरचं लव जिहाद कायदा लागू होणार असल्याची चर्चा रंगतेय. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, लव जिहाद कायद्याबाबत आम्ही पडताळणी करत आहे, अजून कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. परंतु वेगवेगळ्या राज्याने काय कायदे केले आहेत, त्याचा अभ्यास आम्ही या निमित्ताने करणार आहोत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.


सिंधुदुर्गातील कारिवडे धरणात मगरीच्या हल्ल्याच महिलेचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -