घरमहाराष्ट्र'राज्यात सैन्य तैनात करणार' ही अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होणार - गृहमंत्री

‘राज्यात सैन्य तैनात करणार’ ही अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होणार – गृहमंत्री

Subscribe

अशा अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी प्रमाणे दंड आणि शिक्षा होणार

कोरोना सारख्या महामारीचे संकट भारतासह महाराष्ट्रावर देशील ओढावले आहे. या जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून अनेकांचा जीव देखील घेतला आहे, अशा परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांवर संपूर्ण संचार बंदी लागू करण्यासाठी सैन्य तैनात होणार आहे, अशी अफवा पसरली जात आहे. या अफवेसह जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास देखील सांगितले गेले आहे. अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून पसरवला जात आहे.

अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

यासारख्या अफवा पसरवल्या जात असल्याने लोकांनाचा गोंधळ उडाला असून लोकं लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसताय. दरम्यान या बातम्या खोट्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही यावेळी गृहमंत्र्यांनी दिला आहे.

- Advertisement -

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

“नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे मेसेजेस फॉरवर्ड करू नये. कारण यामुळे समाजात घबराट पसरते. महाराष्ट्र सरकार कोविड-19 विरुद्ध लढाईस वचनबद्ध आहे आणि या लढ्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत नागरिकांना वेळोवेळी राज्य सरकार विश्वासात घेत आले आहे,” असेही ते म्हणाले. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी प्रमाणे दंड आणि शिक्षा होऊ शकते, अशी ताकीदही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर विभागाची नजर

अफवा पसरवणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबर विभागाची नजर असून यापूर्वीच त्यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाच्या चौकशीत असे आढळले आहे की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १२ मुख्य यूझर आयडी ८ मे पासून आजपर्यंत या अफवांच्या बातम्या पसरवत आहेत. अशा हँडल विरुद्ध सीआरपीसी सेक्शन १४९ अंतर्गत कायदेशीर चेतावणी देण्याच्या स्वरूपात महा सायबरने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत.


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -