घरमहाराष्ट्रकेंद्राने दिलेला राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठीचा निधी अद्यापही पडून, ठाकरे सरकारवर टीकेची झोड

केंद्राने दिलेला राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठीचा निधी अद्यापही पडून, ठाकरे सरकारवर टीकेची झोड

Subscribe

केंद्र सरकारने दिलेला राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा निधी राज्य सरकारने खर्च केला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यातील ओला तसचं कोरडा दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून फारशी मदत झालेली नाही. यावर प्रश्न उपस्थित केल्यावर केंद्र सरकार निधी देत नाही अशी ओरड महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत असतात. परंतु केंद्र सरकारने दिलेला राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा निधी राज्य सरकारने खर्च केला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे ठाकरे सरकारवर आता टीकेची झोड उठवली जात आहे.

२००५ पासून केंद्र सरकारने १२ व्या, १३ व्या आणि १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींप्रमाणे SDRF आणि NDRF अंतर्गत प्राप्त निधीची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीवरुन मोदी सरकारने काँग्रेसच्या तुलनेत राज्य सरकारला जास्त निधी दिल्याचं स्पष्ट होत आहे. काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदी सरकारकडून राज्याला अडीच पट जास्त निधी देण्यात आला आहे.

- Advertisement -

परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं सावट पसरलं. दुष्काळ, त्यानंतर आलेला महापूर आणि पूर ओसरल्यानंतर परतीच्या पावसामुळे उद्भवलेली अतिवृष्टी यामुळे यंदाच्या वर्षी अनेक जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

अशी आहे आकडेवारी

१) २०२१/२२ यावर्षात एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधून राज्याला ४ हजार ३५२ कोटी रुपयांचा निधी मिळाला.

- Advertisement -

२) पण महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत ३ हजार ६३४ कोटी रुपये निधी खर्च केला.

३) अद्याप ७१८ कोटी रुपये राज्य सरकारने निधी खर्च केलेला नाही.

४) काँग्रेसच्या काळात २०१० ते २०१४ या पाच वर्षात केंद्र सरकारकडुन ७५८२ कोटी रुपये मिळाले होते.

५) तर २०१५ ते २०१९ या पाच वर्षात १७ हजार ५३२ कोटी रुपये केंद्राकडून मिळाले आहेत.


भारताविरोधात अजेंडा राबवणाऱ्या २० YouTube चॅनल्सवर बंदी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -