घरताज्या घडामोडीPushpa फेम रश्मिका मंदानाचा १९व्या वर्षी झाला होता साखरपुडा, पण 'या' कारणामुळे...

Pushpa फेम रश्मिका मंदानाचा १९व्या वर्षी झाला होता साखरपुडा, पण ‘या’ कारणामुळे तुटलं नातं

Subscribe

किरिट पार्टी सिनेमाच्या सेटवर रश्मिकाची अभिनेता रक्षित शेट्टीशी ओळख झाली

अल्लू अर्जुनचा (Allu arjun )  बहुप्रतिक्षित पुष्पा (Pushpa ) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने (rashmika mandanna ) या सिनेमातून खास एंट्री केली आहे. सिनेमातील एका बोल्ड सीनमुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना चांगलीच चर्चेत आली आहे. रश्मिका ही फार हुशार आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहे हे तिने पुन्हा एकदा पुष्पा सिनेमातून दाखवून दिलं आहे. तर दुसरीकडे रश्मिका मंदानाच्या तुटलेल्या नात्याची देखील चर्चा सुरू आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा केवळ १९ व्या वर्षी साखरपुडा झाला होता. मात्र लग्नापूर्वीच तिचं नात तुटलं.

- Advertisement -

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने वयाच्या १९व्या वर्षी किरिट पार्टी या सिनेमातून सिनेसृष्टीत केलं. २०१६ साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमाने चांगली कामगिरी केली होती. रश्मिकाच्या पहिल्याच सिनेमाने तिचं आयुष्य बदललं. किरिट पार्टी सिनेमाच्या सेटवर रश्मिकाची ओळख झाली अभिनेता रक्षित शेट्टी याच्याशी. रक्षितच्या रुपात  रश्मिकाला तिचा सच्चा मित्र आणि तिचे पहिले प्रेम मिळालं होतं. मग सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे जाऊन मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

- Advertisement -

सिनेमाच्या शुटींग दरम्यान दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं. दोघांच्या नात्याची साऊथ सिनेसृष्टीत जोरदार चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दोघांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन त्यांच्या नात्याला नाव द्यायच ठरवलं आणि दोघांनी सगळ्यांसमोर प्रेमाची कबूली दिली.  २०१७मध्ये धुमधडाक्यात दोघांचा साखरपुडा झाला. दोघे एकमेकांसोबत लग्न करुन आयुष्यभर एकत्र येण्याच्या निर्णयापर्यंत पोहचले होते मात्र रश्मिका आणि रक्षित एकमेकांपासून वेगळे झाले.

दोघांच्या नात्याला पूर्णविराम देत रश्मिकाने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहीत म्हटलं होतं की, ‘हे प्रेम नाही, प्रेम परफेक्ट असते. आपण परफेक्ट नाही. आपल्यात अनेक कमतरता आहेत. आपण दोघे वेगवेगळे आहोत. आपण कधीही एक नाही होऊ शकत. आपण एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो. मी तुझ्याकडून जे शिकले ते दुसऱ्या कोणाकडूनच शिकू शकत नाही’. या पोस्टनंतर रश्मिका मंदाना अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर राहिली होती. मात्र आता रश्मिका त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर आलीय आणि तिच्या करिअरवर फोकस करतेय. पुष्पा या सिनेमातून रश्मिकाची जादू आपण पाहू शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका आणि रक्षित यांच्यात कम्‍पॅटिबिलिटी (compatibility) इश्यू होते. म्हणजेच दोघांना एकमेकांना समजून घेण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. रश्मिकाच्या कुटुंबाने रक्षितला स्वीकारले नव्हते. याच दरम्यान रश्मिकाच्या आईने म्हटले होते, आम्ही काळजीत आहो त आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहत आहोत. प्रत्येक व्यक्तीला त्याचे आयुष्य असते. कोणीही एकमेकांना त्रास होईल असे वागू शकत नाही.


हेही वाचा – ह्रतिकसोबत घटस्फोटानंतर पत्नी सुझॅन खान अरसलान गोनीच्या प्रेमात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -