घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र पोलिसांनीही पडली अण्णा नाईकांची भुरळ, म्हणतायत...

महाराष्ट्र पोलिसांनीही पडली अण्णा नाईकांची भुरळ, म्हणतायत…

Subscribe

झी मराठीवरील प्रसिद्ध ‘रात्री खेळस चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. यातील अण्णा नाईक आणि शेवंता या पात्राने तर धूमाळूक घातला. त्यामुळे या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर तिसऱ्या पर्वाचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अगदी रस्त्याकडे जवळील भिंतींपासून ते रेल्वे प्लॅटफॉर्मपर्यंत ‘अण्णा नाईक परत येणार, अण्णा परत येणार’च्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता थेट मुंबई लोकलमध्येही ‘अण्णा नाईक परत येणार’ च्या रंगू लागल्या आहे. यातच महाराष्ट्र पोलिसांनीही अण्णा नाईकांनी भुरळ घातली आहे. या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. याचा आधार घेत महाराष्ट्र पोलिसांनी हटके ट्वीट केले आहे. त्यामुळे अण्णा नाईक परत येणार म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीटचे टाईमिंग जुळून आणले आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी अण्णा नाईकांचा मास्क घातलेला एक हटके फोटो शेअर करत लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या ट्वीटरवरील अण्णा नाईकांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

या ट्वीटमध्ये अण्णा नाईक या पात्राला मास्क लावून पोलिसांनी मास्क वापरतास ना ? अशी मालवणी भाषेत कॅप्शन दिली आहे. यातून नागरिकांनी त्यांनी कोरोनाबाबत जगजागृती केली आहे. मास्क लावणे, अंतर राखणे, हात स्वच्छ करणे, ‘तीन’ गोष्टी लक्षात ठेवूयास कोरोनाचा ‘खेळ’ संपवूया! असे ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे. मुंबई पोलिसांच्या या भन्नाट ट्विटची सध्या सोशल मीडियाही तुफान चर्चा आहे.

- Advertisement -

याआधी अण्णा नाईक मुंबईच्या लोकलमध्य़ेही झळकले आहेत. या मालिकेचा लक्ष्यवेधी प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. यात मुंबई लोकलमध्ये अण्णा नाईक परत येणार अण्णा नाईक परत येणार असे लिहिलेले असते ते वाचून लोक हसत असतात आणि खिल्ली उडवतात. तेवढ्य़ात अचानक बाहेरील खिडकीतून अण्णा नाईक गंभीर नजरेने पाहताना दिसतात. हे पाहून प्रवासी क्षणासाठी दचकतात. व अण्णा नाईक परत येणार, म्हणत अण्णा वाऱ्यासह गायब होतात. त्यामुळे या मालिकेच्या प्रदर्शानापूर्वीच तुफान जाहिरातबाजी केली जात आहे. या जाहिरातींना प्रेक्षकही मोठ्याप्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार हे पाहणे लक्षवेधी असणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -