घरट्रेंडिंग67th National Film Awards: 'बार्डो' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; बघा विजेत्यांची संपूर्ण...

67th National Film Awards: ‘बार्डो’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; बघा विजेत्यांची संपूर्ण यादी

Subscribe

बघा ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांची नावे...

दिल्लीतील नॅशनल सेंटरमध्ये ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटाकरता सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगनाला जाहीर करण्यात आहे. तर ‘भोंसले’ चित्रपटाकरता अभिनेता मनोज वाजपेयी आणि ‘असुरन’ या तामिळ चित्रपटाकरता धनुष या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या सर्व चित्रपटाच्या यादीत शिरपेचात मानाचा तुरा म्हणजे मराठी चित्रपट बार्डोने देखील पुरस्कार पटकावला आहे.

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं हे ६७ वं वर्ष असून भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे या सर्व पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येते मात्र यंदा देशावर कोरोनाचं संकट असल्याने पुरस्कार सोहळा पार पडला नाही. मात्र यंदाच्या वर्षातला राष्ट्रीय पुरस्काराचा मान कोणता चित्रपट पटकावणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिले होते. बघा ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांची नावे…

- Advertisement -

फीचर फिल्म विभागात पुरस्काराची घोषणा

  • स्पेशल मेंशन- बिरियानी (मल्याळम), जोनाकि पोरवा (असमिया)
    लता भगवानकरे (मराठी)
    पिकासो (मराठी)
  • बेस्ट हरियाणवी चित्रपट- छोरियां छोरों से कम नहीं
  • बेस्ट छत्तीगढ़ी चित्रपट- भुलन दी मेज
  • बेस्ट तेलुगु चित्रपट- जर्सी
  • बेस्ट तमिळ चित्रपट- असुरन
  • बेस्ट पंजाबी चित्रपट- रब दा रेडियो 2
  • बेस्ट मलियाली चित्रपट- कला नोत्तम
  • बेस्ट मराठी चित्रपट- बार्डो
  • बेस्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
  • बेस्ट सहाय्यक एक्ट्रेस- पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
  • बेस्ट सहाय्यक एक्टर- विजय सेतुपती (सुपर डिलक्स)

बेस्ट फीमेल प्लेबॅक- सावनी रवींद्र (बार्डो)
बेस्ट मेल प्लेबॅक- बी. प्राक (तेरी मिट्टी)
बेस्ट एक्ट्रेस- कंगना रनौत (पंगा आणि मणिकर्णिका)
बेस्ट एक्टर- मनोज बाजपेयी (भोसले) अभिनेता धनुष (असुरन)
बेस्ट डायरेक्टर- संजय पूरे सिंह चौहान (भट्टर हूरेन)

बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
बेस्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
बेस्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय

- Advertisement -

बेस्ट पॉप्युलर फिल्म- महर्षी

इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ ए डायरेक्टर- हेलन (मल्याळम)
बेस्ट फीचर फिल्म- मल्याळम फिल्म (Marakkar Arabikkadalinte- SimHam)


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -