घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : 'ऑपरेशन लोटस'च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज; थोरात स्पष्टच बोलले

Maharashtra Politics : ‘ऑपरेशन लोटस’च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज; थोरात स्पष्टच बोलले

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत, तर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन लोटस’च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते आज पत्रकारांशी संवाद साधत होते. (Maharashtra Politics People upset over the functioning of Operation Lotus Balasaheb Thorat spoke clearly)

हेही वाचा – Maharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

- Advertisement -

बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं ही अत्यंत दुर्भाग्याचं आणि खंत निर्माण करणारी गोष्ट आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वडील आणि अशोक चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री राहिले. त्यांना काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी देण्यात आली. देशपातळीवरच्या संधी देण्यात आल्या. यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा? हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही. परंतु याची खंत आणि दुःख आम्हाला आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट आवडणार नाही. पण यापुढे आणखी काय होणार? हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. येणाऱ्या काळात राज्यसभेची निवडणूकसुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे, त्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष अशी आमची आघाडी एकत्र पद्धतीनं भारतीय जनता पक्षाबरोबर निश्चितपणे चांगली लढाई करू, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

आम्ही 14 आणि 15 तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळात बोलावलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि राज्यसभेचा उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार आहोत, असे स्पष्ट केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आले की, अशोक चव्हाण यांना व्हीप जारी करणार का? यावर ते म्हणाले की, ही कायदेशीर कारवाई आहे, त्यामुळे ती योग्य पद्धतीने करण्यात येईल. त्याचवेळी काँग्रेसच्या सर्व आमदारांसोबत तुमचा संपर्क होऊ शकला का? यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी फिरत असतात, त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही. परंतु बहुतांशी आमदारांशी आमचा संपर्क होतो आहे. आमचे काही मित्रसुद्धा त्यांच्याशी संपर्क करत आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यासाठी गेले की, आणखी कशासाठी? ठाकरेंचा सवाल

अकरा आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपाचं ऑपरेशन लोटस सुरू झालं आहे, अशी माहिती मिळते. या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही आकडे समोर येत आहेत, नावं सुद्धा येत आहेत, आपल्या चॅनेलवर आम्ही चौकशी केली असता आम्हाला सांगण्यात येते की, असं काहीही नाही. याचा अर्थ असा की, असे अफवा पसरवण्याचं काम चाललेलं आहे. खरं तर ऑपरेशन लोटसचा हा एक भाग आहे. अनेक राज्यामध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेलं आहेत. हा अनुभव महाराष्ट्रसुद्धा घेतो आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता आणि देशातली जनता सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -