घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMaharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

Maharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत 10 ते 12 आमदारांचा गटही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोलत होते. (Maharashtra Politics Those who proclaimed Congress free are now in Congress hands Criticism of Uddhav Thackeray)

हेही वाचा – Maharashtra Politics : आपल्या देशात काहीही घडू शकते! चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊतांचे ट्वीट चर्चेत

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपासोबत गेले. त्यामुळे आता मी बघतो आहे की, निवडणूक आयोग म्हणून जो काही तिकडे लबाड बसला आहे, त्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी चोराच्या हाती दिली. त्यामुळे आता काँग्रेससुद्धा चोराच्या हातात देतो हे पाहावे लागेल, कारण ते काहीही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत, बेडकुळ्या तर येत नाही आहे. फक्त दंड थोपटत आहेत, पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याने आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संसदेत आपल्या पंतप्रधानांनी भाषण केलं की, अबकी बार येवढे पार, तेवढे पार, एवढे पार असतील तर ही फोडाफोडी का करत आहात? असा सवाल करत याचा अर्थ तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे. तुम्ही 400 पार काय 40 पारही नाही होणार आहात? म्हणून तुम्ही तिकडे नितीशकुमार, याठिकाणी अशोक चव्हाण, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना घेतले. जर भारतीय जनता पक्षाने 10 वर्षे प्रामाणिकपणे काम केलं असतं तर ही वेळ आली नसती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसव्यप्त भाजपा अशी परिस्थिती

भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाडोत्री सगळी लोकं घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत, त्यांच्या बोडक्याव बसवत आहेत. काही वर्षांपूर्वी भाजपावाचा नारा होता, काँग्रेसमुक्त भारत, पण आता इतके सर्व काँग्रेसवाले घेत आहेत, की काँग्रेसव्यप्त भाजपा अशी त्यांची परिस्थिती झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -