घरमहाराष्ट्रVarsha Gaikwad: मोदी-शहांच्या सत्तेने राजकारणाचे बाजारीकरण; वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

Varsha Gaikwad: मोदी-शहांच्या सत्तेने राजकारणाचे बाजारीकरण; वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

Subscribe

राज्यातील राजकारणात आज सर्वात मोठी उलथापालथ झाली. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्त्व पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी मोठा धक्का मानल्या जात आहे. या घडामोडीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुत्राने राजीनामा काँग्रेसचा राजीनामा देणं म्हणजे मुलाने आईला नाकरण्यासारखं असल्याचे ते म्हणाले.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेस सदस्यत्त्वाचा आज 12 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत असतानाच आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशोख चव्हाणांच्या राजीनाम्यावरुन त्यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लोबोल केला. (Varsha Gaikwad Marketization of Politics by Modi-Shah Power Varsha Gaekwads rant)

राज्यातील राजकारणात आज सर्वात मोठी उलथापालथ झाली. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्त्व पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी मोठा धक्का मानल्या जात आहे. या घडामोडीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुत्राने राजीनामा काँग्रेसचा राजीनामा देणं म्हणजे मुलाने आईला नाकरण्यासारखं असल्याचे ते म्हणाले. याच दरम्यान मुंबई कांग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये त्यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भाष्य करतच केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही – सुशीलकुमार शिंदे

- Advertisement -

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

माजी मंत्री तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, कल तक जिसने कसमें खाई, दुख में साथ निभाने की, आज वो अपने सुख की खातिर, हो गए किसी बेगाने के…. अशा शेरो-शायरी अंदाजात त्यांनी अशोक चव्हाणाच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. पुढे पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, कालपर्यंत जे या हुकुमशाही सत्तेच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात आमचे साथीदार होते, ते आज अचानक न्यायाचा ‘हात’ सोडून गेले यावर अजूनही विश्वास बसत नाही. अशोक चव्हाणांचा निर्णय खेदजनक आहे. ज्यांच्या विरोधात लढले त्या लोकांमध्येच जाऊन ते सामील होणार असल्याचे आडाखे बांधले जाताहेत. हे अतिशय दुःखद आहे. अशा शब्दांत त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपात करणार प्रवेश | Ashok Chavan

दहा वर्षांत 411 आमदारांना भाजपात घेतलं

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर खंत व्यक्त करतच माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये पुढे त्यांनी लिहिले की, राजकारण ही आयुष्यभराची निष्ठा आहे, लोकसेवेचे आणि राष्ट्र उभारणीचे साधन आहे. पण मोदी-शहा यांच्या लोकशाही विरोधी सत्तेने राजकारणाचे बाजारीकरण केले आहे. साम-दाम-दंड-भेद हे धोरण अवलंबून भाजपने गेल्या 10 वर्षांच्या अन्याय काळात विरोधी पक्षातील 411 आमदारांना आपल्या पक्षात सामावून घेतले. अनेक पक्ष फोडले. हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. पण सत्य आणि न्यायासाठी आमचा लढा सुरूच राहील. लांब पल्ल्याच्या प्रवासात काही सोबती राहतात, काही निघून जातात. पण प्रवास म्हणजेच पुढे चालत राहणे आहे. आम्ही लढू आणि जिंकू! असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -