घरमहाराष्ट्रPolitics : "तुतारी" फक्त स्टेजवर...; अजित पवार गटाची टीका, आव्हाडांवरही साधला निशाणा

Politics : “तुतारी” फक्त स्टेजवर…; अजित पवार गटाची टीका, आव्हाडांवरही साधला निशाणा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. विधिमंडळातील संख्याबळावरून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले. त्यामुळे आता शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर गुरुवारी (22 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी” चिन्ह दिले आहे. मात्र यावर आता गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी टीका केली आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics Tutari is played only to welcome dignitaries on stage Criticism of Ajit Pawar group Jitendra Awhad also targeted)

हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग नरमले; मुंबईतील शिक्षकांना कामातून वगळले

- Advertisement -

शरद पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यावर अजित पवार गटाने नेते अनिल पाटील म्हणाले की, ‘तुतारी’ ही फक्त आता स्टेजवर मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी वाजविली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मिळालेली तुतारी ही फक्त स्टेजवर स्वागतासाठीच वाजविली जाईल. सामान्य माणसांपर्यंत या तुतारीचा आवाज पोहोचणार नाही. ती मर्यादीत राहिल, असे अनिल पाटील म्हणाले. याचवेळी जितेंद्र आव्हाड यांच्या नव्या नाऱ्यावर बोलताना अनिल पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचीच ‘तुतारी’ बंद होणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनात चाटूगिरी करण्याशिवाय दुसरे काहीही काम केलेले नाही. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात एकही आमदार निवडून आणलेला नाही, असा टोला अनिल पाटील यांनी लगावला आहे.

एकनाथ खडसेंची परिस्थिती “घर का ना घाट का” 

एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना अनिल पाटील म्हणाले की, त्यांची परिस्थिती “घर का ना घाट का” अशी झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना भवितव्य दिसत नाही आणि भाजपामध्ये त्यांना कुणी घेत नाही. त्यामुळे जावं तर कुठे जावं, अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. त्यामुळे दिशाहीन जर कोणतं नेतृत्व असेल तर ते एकनाथ खडसे याचं आहे, असं मला वाटतं. एकनाथ खडसे यांना भाजपामध्ये घ्या, असं म्हणणारा एकही भाजपाचा कार्यकर्ता मला दिसलेला नाही, असेही अनिल पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : रायगडावर घुमणार “तुतारी”चा आवाज; नव्या चिन्हासह पवार फुंकणार लोकसभेचे रणशिंग

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला “तुतारी” हे पक्षचिन्ह दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एका योद्ध्याला शोभेल असंच हे पक्षचिन्ह आहे. 84 वर्षांचा म्हातारा, होय मी त्यांना असंच म्हणतो. कारण 84 वर्षांचा म्हातारा युद्धाला उभा राहिला आहे आणि संकेत काय मिळाले आहेत? तर “तुतारी”. त्यामुळे आता “वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी”. तुतारी वाजली आहेच आणि आम्ही युद्धासाठी आता तयार आहोत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय भूमीतले भीष्माचार्य म्हणजे शरद पवार त्यांच्यासह आम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहोत. “लडेंगे और जितेंगे”, परत एकदा सांगतो “वाजवा तुतारी” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला नाव न घेता इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -