घरमहाराष्ट्रRain Update : राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस, मराठवाड्यात यलो अलर्ट...

Rain Update : राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस, मराठवाड्यात यलो अलर्ट जारी

Subscribe

राज्यभरात पावसाची संततधार सतत सुरु आहे. मुंबई, कोकण, मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अशातच राज्य़ात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातक आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या क्षेत्रांमुळे देशात पावसाचा कालावधी लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो मात्र यंदा सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यभरात मुसळधार पावसाची सरी कोसळत आहेत. त्यामुळे राज्यभरात चांगला पाऊल बघायला मिळत आहे. यात राज्यातही पुढील तीन दिवस मुळसधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’ जाहीर

मराठवाड्यातील प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावासाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसासह वाऱ्यांचा वेग अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान देखील सर्वत्र पावसाच्या सरी बरसणार आहेत.

- Advertisement -

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईतही पुढील तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज व्य़क्त केला जात आहे. मुंबईत ऊन-पावसाचा खेळ रंगला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार अस स्पष्ट केले. यात काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र मुंबईभर मुसळधार पावसाने दमदार बँटिंग केली. मात्र दुपारपासून पावसानी थोडी उसंती घेतली आहे.


पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार, तुमच्या खिश्यावर पडणार भार?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -