Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Maharashtra corona update: गेल्या २४ तासात बाधितांच्या संख्येत वाढ; १२,२०७ नव्या रूग्णांची...

Maharashtra corona update: गेल्या २४ तासात बाधितांच्या संख्येत वाढ; १२,२०७ नव्या रूग्णांची नोंद, ३९३ बळी

Related Story

- Advertisement -

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी-जास्त होत आली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावाचे प्रमाण लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर पुन्हा वाढल्याचे गुरूवारी दिसून आले आहे. बुधवारी राज्यात दिवसभरात १०,९८९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले तर २६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मात्र आज गुरूवारी कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या २४ तासात १२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले तर ३९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज राज्यात १२,२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,७६,०८७ झाली आहे. यासह आज ११,४४९ रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५ टक्के एवढे झाले आहे. यासह सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७३,५६,७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,७६,०८७ (१५.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७६,१६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या एकूण ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १५२२ ने वाढली आहे. हे १५२२ मृत्यू, ठाणे-५७३, पुणे-२४४, नाशिक-८६, अहमदनगर-६७, नांदेड-५८, बीड-५७, यवतमाळ-५७, रायगड-५०, नागपूर-४२, जालना-४०, कोल्हापूर-३६, बुलढाणा-३३, सांगली-३२, अकोला-२१, पालघर-१८, सातारा-१८, चंद्रपूर-१५, रत्नागिरी-१२, औरंगाबाद-१०, गोंदिया-१०, नंदूरबार-९, परभणी-८, सोलापूर-८, हिंगोली-५, उस्मानाबाद-५, गडचिरोली-२, लातूर-२, अमरावती-१, धुळे-१, सिंधुदुर्ग-१ आणि वर्धा-१ असे आहेत.


- Advertisement -