घरक्रीडाWTC Final : भारतीय संघाची सरावाला सुरुवात, विराटची नेट्समध्ये फलंदाजी; पहा व्हिडिओ

WTC Final : भारतीय संघाची सरावाला सुरुवात, विराटची नेट्समध्ये फलंदाजी; पहा व्हिडिओ

Subscribe

इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंना सराव करता आला.

भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून पुढील शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तत्पूर्वी भारताने या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंना गटांमध्ये सराव करता आला. खेळाडूंना तीन किंवा चार जणांच्या गटांमध्ये विविध वेळेत मैदानात जाऊन सराव करण्याची परवानगी होती. याचा फायदा घेत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह भारताच्या अन्य खेळाडूंनी नेट्समध्ये अंतिम सामन्याच्या तयारीला सुरुवात केली.

स्लिपमध्ये झेल पकडण्यावर भर

भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या गटांमध्ये केलेल्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये फलंदाजांप्रमाणेच जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, सिराज आणि अश्विन यांसारखे गोलंदाजही नेट्समध्ये कसून सराव करताना दिसले. नेट्स झाल्यावर खेळाडूंनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्ररक्षणाचा सराव केला. यात प्रामुख्याने स्लिपमध्ये झेल पकडण्यावर भर देण्यात आला.

- Advertisement -

त्यानंतर एकत्रित सराव करता येणार   

भारतीय खेळाडूंचा क्वारंटाईनचा कालावधी शुक्रवारी संपणार असून त्यानंतर त्यांना एकत्रित सराव करता येईल. त्याआधी खेळाडूंना साऊथहॅम्पटनच्या मैदानात असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी मिळाली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका होईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -