घर महाराष्ट्र "महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा..."; 'या' मंत्र्यांची राज ठाकरेंवर...

“महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा…”; ‘या’ मंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

Subscribe

मुंबई : “महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? “, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवीद्र चव्हाण यांनी खुले पत्र लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी पत्र ट्वीट केले आहे. “दगड फोडला तर कलाकृती उभी राहते दगड फेकला तर विध्वंस होतो”, असे ट्वीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम अद्यापही पूर्ण नाही आणि महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्यावरून राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिक घेत आहे. यानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर तोडफोड केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी पत्र लिहून मनसैनिकांच्या आक्रमक भूमिकेवर सवाल उपस्थितीत करत हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

रवींद्र चव्हाण यांनी पत्रता म्हणाले, “दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे…. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.”

हेही वाचा – “लोकांमधला राग मतपेटीत उतरला पाहिजे”, खड्ड्यांच्या मुद्यांवर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

महामार्गाचा सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल

- Advertisement -

महामार्गाच्या कामासंदर्भाच रवींद्र चव्हाण म्हणाले, “मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून… दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामे करणारी तरुणाईची साथ हवी आहे…. अवघ्या महाराष्ट्राला…”

हेही वाचा – खळ्ळखट्याक : राज ठाकरेंचा सकाळी आदेश; कार्यकर्त्यांनी दुपारी कंपनीचे ऑफिस फोडले

महामार्गाची 8 वेळा केली पाहणी

“केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती”, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.

- Advertisment -