घरमहाराष्ट्रतिवरे धरण दुर्घटना : दैव बलवत्तर म्हणून बचावले बाळकृष्ण चव्हाण

तिवरे धरण दुर्घटना : दैव बलवत्तर म्हणून बचावले बाळकृष्ण चव्हाण

Subscribe

तिवरे धरणफुटीत वाहून गेलेल्या ११ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत वाहून गेलेल्या चव्हाण कुटूंबातील ५५ वर्षीय बाळकृष्ण चव्हाणांचा शोध लावण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तब्बल १८ तासांनंतर बाळकृष्ण चव्हाण जीवंत सापडले. मदत पथकाने त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


हेही वाचा – तिवरे धरणाला भगदाड


मंगळवारी रात्री चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. या घटनेत धरणाशेजारील गावांचे अतोनात नुकसान झाले. तिवरे गावातील भेंडेवाडीला या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका बसला. भेंडेवाडीतील सर्वात मोठी वस्ती असलेल्या चव्हाण कुटूंबियांची कुटूंबं या घटनेत पाण्यासोबत वाहून गेली. या दुर्घटनेत २४ जण वाहून गेले होते. त्यातील १२ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत.

- Advertisement -

अद्याप ११ जण बेपत्ता

काल रात्री ९.३० च्या सुमारास घडलेल्या घटनेत वाहून गेलेल्यांना शोधण्याचे कार्य एनडीआरएफ आणि स्थानिक गावकऱ्यांची टीम करत आहे. या पथकांना बाळकृष्ण चव्हाण हे जिवंत आढळून आले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप ११ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.


हेही वाचा – ‘त्या’ अधिकाऱ्याला शोधून काढा – नितेश राणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -